कराड तालुक्यात चोरीस गेलेल्या 3 मोटार सायकली 3 विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून जप्त...कराड तालुका डीबी पथकाची कारवाई.
चोरीस गेलेल्या 3 मोटार सायकली 3 अल्पवयीन बालकांकडून जप्त...कराड तालुका डीबी पथकाची कारवाई.
कराड दि.1-कराड तालुक्यातील तांबवे येथून आठ दिवसांपूर्वी चोरीस गेलेल्या गाडीची तक्रार कराड तालुका पोलीस स्टेशन येथे झाली होती. त्यानुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून विंग तालुका कराड येथे तीन अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) बालकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता संबंधितांनी तांबवेसह मलकापूर व कोळे येथून तीन मोटरसायकली चोरल्याची माहिती दिली. याबाबत संबंधितांकडून त्या मोटरसायकली जप्त करत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना मिटींगमध्ये सुचना व मार्गदर्शन केले होते.
दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री तांबवे ता.कराड येथुन एका घरासमोरुन अंगणातुन प्लेझर मोटारसायकल क्रमांक MH 50 T 9868 ही मोटर सायकलची चोरी झाल्याची तक्रार प्रकाश पंढरीनाथ सुतार रा. तांबवे यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला दिली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे सुचनेनुसार काल गुरुवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहा.पो.उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना मिळालेल्या बातमीनुसार विंग ता. कराड येथे सापळा लावला असता, एक प्लेजर मोटारसायकल वरुन 3 विधीसंघर्षग्रस्त बालकांना जात असताना संशयीतरित्या पकडले. पोलीस स्टेशन अभिलेखावर खात्री करुन, त्यांना पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरची प्लेजर मोटारसायकल क्रमांक MH 50 T 9868 ही तांबवे येथुन दि. 22/02/2024 रोजी चोरी केलेचे कबुल केले असुन त्याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशन ला गुन्हा नंबर 129/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तसेच त्यांचेकडुन कोळे येथील बैलगाडी शर्यती मधील पाकिंगमधुन चोरी केलेली बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक MH 10 AP 6723 व मलकापुर नगरपालिका जवळून चोरी केलेली एच एफ डिलक्स मोटारसायकल MH 50 F 6650 या मोटारसायकली दि. 23/02/2024 व 28/02/2024 रोजी चोरी करुन त्या त्याचे घरासमोर लावलेल्या 2 मोटारसायकल अशा एकूण 3 मोटारसायकल किं. रु. 1,55000/- रुपये किमतीच्या हस्तगत करुन जप्त करण्यात आली आहे.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे ओपीचे सहा. पो. उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली असुन पुढील तपास पो. हवा. नितीन येळवे हे करीत आहेत.

Comments
Post a Comment