कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे गंभीर बाब;स्वाती पांडे...

कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे गंभीर बाब;स्वाती पांडे...

एमएडीसीच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांनी व्यक्त केली चिंता; विमानतळाची केली पाहणी...

कराड दि 8 (प्रतिनिधी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे व अपर जिल्हाधिकारी बी दीपक नलवडे यांनी आज कराड विमानतळास भेट देऊन पाहणी केली. विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी केली. मात्र विमानतळ परिसरात वाढणारी अनधिकृत बांधकामे पाहता त्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत विमानतळ परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कलर कोडेड झोनिंग मॅपची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश दिले.

कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान व्यवस्थापक कृणाल देसाई, अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे संचालक परवेज दमानिया, बेस इन्चार्ज पंकज पाटील, नितेश तिवारी, सीएफओ देशराज यांनी स्वाती पांडे यांचे स्वागत केले.

कराड विमानतळ विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे 221 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विस्तारीकरणाबाबत शासन सकारात्मक असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील विमानतळांचा आढावा घेताना कराड विमानतळाची भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनीही विमानतळाच्या विस्तारवाढी बाबत साताऱ्यात आढावा बैठक घेऊन वर्षभरात येथील कामे मार्गे लावणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे व अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी आज कराड विमानतळास भेट देऊन पाहणी केली.

स्वाती पांडे आणि दीपक नलवडे यांनी विमानतळाची धावपट्टी व प्रशासकीय कार्यालयाची पाहणी केली. विमानतळ परिसरात कलर कोडेड झोनिंग मॅपचे उल्लंघन होत आहे. परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर, अनधिकृत बांधकामे होत असल्याने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अशा धोकादायक बांधकामांमुळे विमानतळ विमानतळास बाधा येण्याची शक्यता असून परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत काटेकोर अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

विमानतळाची धावपट्टी व नाईट लँडिंगच्या कामांची पाहणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नाईट लँडिंग व विस्तार वाढ करण्यासाठी तत्पर आहे. यासाठी सर्व शासकीय विभागांनी तातडीने व तत्परपणे सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी विमानतळावरील कामांची माहिती दिली.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक