कराड येथे लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन...

 

कराड येथे लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन...

कराड दि.2-लिबर्टी मजदूर मंडळ व रणजीत पाटील (नाना) कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दि ४ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये राज्यस्तरीय ३५ किलोगट व ७० किलोगट निमंत्रित व्यावसायिक पुरुष गट, महिला खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे सचिव रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहसचिव विजय गरूड, खजिनदार, मुनीर बागवान, अॅड. मानसिंग पाटील, काशिनाथ भाऊ चौगुले, भास्कर पाटील, सचिन पाटील, दादासो पाटील, राजेंद्र जाधव, विजय कुलकर्णी, किशोर शिंदे, एकनाथ बागडी, अशपाक मुजावर उपस्थित होते.

लिबर्टी मजदूर मंडळ कबड्डी या खेळाच्या प्रसार व प्रचारासाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. लिबर्टी मजदूर मंडळाने याच्या अगोदर भरपूर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. लिबर्टी मजदूर मंडळ व रणजीत पाटील (नाना) मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 4 ते 9 फेब्रुवारी 2023 रोजी लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर मुख्यमंत्री चषक २०२३ या राज्यस्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. सदर स्पर्धा अत्यंत उत्तमरीत्या पार पाडल्या. लिबर्टी मजदूर मंडळास 48 वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा चे उत्कृष्ट स्पर्धा आयोजन केल्याबद्दल गौरविण्यात आले. लिबर्टी मजदूर मंडळाने आजपर्यंत अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. लिबर्टी मजदूर मंडळ हे कबड्डी क्षेत्रामध्ये 69 वर्ष सलग कार्यरत आहे.

मुख्यमंत्री चषक २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिक निमंत्रित पुरुष व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम मुंबई, बँक ऑफ बडोदा, मुंबई, बी.पी.टी. मुंबई, इन्कमटॅक्स पुणे, सेन्ट्रल बँक मुंबई, मुंबई कस्टम मुंबई, पोस्टल मुंबई, मिडलाईन कर्जत रायगड, न्यू इंडिया इन्शुरन्स मुंबई, महिंद्रा ग्रुप मुंबई, हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, सेन्ट्रल रेल्वे माटुंगा, मुंबई, ठाणे महानगर पोलीस ठाणे या संघाचा समावेश आहे. तर महिला गटांमध्ये शिवशक्ती मुंबई शहर, शिरोडकर मुंबई शहर, स्वामी समर्थ, मुंबई शहर, स्वराज्य संघ, मुंबई उपनगर, महात्मा गांधी, मुंबई उपनगर, राजमाता संघ, पुणे, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल रायगड, कराड, सातारा, होतकरू मंडळ ठाणे, जिजामाता संघ मुंबई, कौलव संघ कोल्हापूर या महिला संघांचा समावेश आहे.

या स्पर्धेत नामांकित खेळाडू सहभागी होणार असून यामध्ये रेखा सावंत - शिव छत्रपती पुरस्कार- राजमाता जिजाऊ पुणे, अपेक्षा टाकळे- शिव छत्रपती पुरस्कार - शिवशक्ती मुंबई, आम्रपाली गलांडे -राष्ट्रीय खेळाडू - प्रकाश तात्या बालवडकर, सायली केरीपाळे, मंदिरा कोमकर राष्ट्रीय खेळाडू - राजमाता जिजाऊ पुणे अंकिता चव्हाण - राष्ट्रीय खेळाडू - प्रकाश तात्या बालवडकर, साक्षी गावडे - राष्टीय खेळाडू बारामती स्पोर्ट्स अकॅडेमी, निलेश शिंदे - शिवरात्री पुरस्कार, प्रो कबड्डी, भारत पेट्रोलियम, रिशांक देवाडीगा - शिवछत्रपती पुरस्कार, प्रो कबड्डी - भारत पेट्रोलियम, सुनील दुबिले- प्रो कबड्डी, मुंबई कस्टम, अजिंक्य पवार, सौरभ कुलकर्णी, राष्टीय खेळाडू - पोस्टल मुंबई हे नामांकित खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

७० किलो गट बक्षिसे-प्रथम क्रमांक रु. २५,५५५/व चषक, द्वितीय क्रमांक रु. १५,५५५/- व चषक, तृतीय क्रमांक रु. ११,१११/- व चषक, अष्टपैलू खेळाडू रु. १,५५५/- व चषक, उत्कृष्ट चढाई रु. १,१११/- व चषक, उत्कृष्ट पक्कड रु. ७७७/- व चषक

३५ किलो गट बक्षिसे- प्रथम क्रमांक रु. १५,५५५/- व चषक, द्वितीय क्रमांक रु. ११,१११/- व चषक, तृतीय क्रमांक रु.७,७७७/- व चषक, अष्टपैलू खेळाडू रु. १,१११/- व चषक, उत्कृष्ट चढाई रु. ७७७/- व चषक, उत्कृष्ट पक्कड रु. ७७७/- व चषक

महिला खुला गट बक्षिसे-प्रथम क्रमांक-रु. १,११,१११/- व चषक, द्वितीय क्रमांक-रु. ५५,५५५/- व चषक, तृतीय क्रमांक-रु. ३३,३३३/- व चषक, चतुर्थ क्रमांक-रु. ३३,३३३/- व चषक, अष्टपैलू खेळाडू-रु. ३,३३३/- व चषक, उत्कृष्ट चढाई-रु. २,२२२/- व चषक, उत्कृष्ट पक्कड-रु. २,२२२/- व चषक

पुरुष व्यावसायिक गट बक्षिसे-प्रथम क्रमांक-रु. २,२२,२२२/- व चषक, द्वितीय क्रमांक-रु. १,११,१११/- व चषक, तृतीय क्रमांक-रु.५५,५५५/- व चषक, चतुर्थ क्रमांक-रु.५५,५५५/- व चषक, अष्टपैलू खेळाडू-रु. ५,५५५/- व चषक, उत्कृष्ट चढाई-रु. ३,३३३/- व चषक, उत्कृष्ट पक्कड- रु . ३,३३३/- व चषक 


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक