व्यवसाय अथवा आर्थिक व्यवहार करत असताना कराड अर्बन बँक पाठीशी असल्याने निश्चिंत असतो...
व्यवसाय अथवा आर्थिक व्यवहार करत असताना कराड अर्बन बँक पाठीशी असल्याने निश्चिंत असतो...
ग्राहक समिती सदस्य, मूल्यांकनकार व कायदेशीर सल्लागार यांच्या मेळाव्यात सभासदांनी व्यक्त केला विश्वास...
कराड दि.6- कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचा ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी मुख्य कार्यालयात बँकेच्या ग्राहक समिती सदस्य, मूल्यांकनकार व कायदेशीर सल्लागार यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास बँकेच्या सर्व ६२ शाखांचे ग्राहक समिती सदस्य, मूल्यांकनकार, कायदेशीर सल्लागार व सभासद ग्राहक उपस्थित होते. यावेळी डॉ. सुभाष एरम यांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले की, बँकेच्या १०७ वर्षाच्या काळात १५ जाणांनी अध्यक्षपद भूषविले परंतू यामध्ये अध्यक्षपदाचा सर्वाधिक कालावधी म्हणजे २१ वर्षांचा कालावधी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी भूषविला आहे. डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेच्या ३८ शाखांवरून ६२ शाखा झाल्या असून एकूण व्यवसायात ५४६ कोटी वरून ४७०० कोटीपर्यंत मजल मारली आहे. सभासद संख्या ६०,००० ने वाढली याचे कारण म्हणजे स्व.डॉ.द.शि. एरम व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी सभासद खातेदार व व्यवस्थापन यांच्यात ताळमेळ राखत अर्थकारण करण्याची जी अर्बन संस्कृती अधोरेखीत केलेली तीच डॉ. सुभाष एरम यांनी यशस्वीपणे जपली आहे.
प्रास्ताविकामध्ये बोलत असताना बँकेचे संचालक प्रा. अनिल बोधे यांनी सांगितले की, बँकेच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम या नावाने कराड अर्बन बँकेची नवीन ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या शिस्तप्रिय व्यवस्थापनाने व विनम्र स्वभावामुळे बँकेवर सभासद-ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. त्यांच्यावर अर्बन परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे प्रेम आहे त्याचबरोबर ते नेहमीच ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांचे मार्गदर्शन घेत असतात, यामुळेच त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत बँकेने प्रगतीचे व यशाचे अनेक महत्वपूर्ण टप्पे सर केले आहेत. ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना, भविष्यात बँक मोठी झाली पाहिजे. बँक सुस्थितीत राहण्यासाठी बँकेची धुरा चांगल्या लोकांच्या हातात देणे आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापन व सेवक यांच्यात सद्भाव, ताळमेळ असणे आवश्यक असते, तो साधन्याचे काम अध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष एरम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत, असे सांगितले.
अध्यक्ष डॉ. सुभाष एरम मेळाव्यास संबोधताना असे म्हणाले की, मी बँकेची २१ वर्षापासून जी अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे, यामध्ये सुभाषराव जोशी यांचे मार्गदर्शन सर्व ग्राहक-सभासद यांचा असलेला विश्वास, संचालक सहकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्यासह सर्व सेवकांची साथ याचा मोलाचा वाटा आहे. आजच्या कार्यक्रमामुळे मला २० वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटत असून बँकेबरोबरच अर्बन कुटुंबाचा होत असलेलाविस्तार मला अधिक काम करण्यास नेहमीच प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त करत वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्कारासाठी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. सुभाष एरम हे जरी व्यवसायाने सुप्रसिद्ध डॉक्टर व बँकेचे अध्यक्ष असले तरी सर्वांशी नेहमी सभासदांचे प्रतिनीधी म्हणूनच विनम्रतेने, प्रेमाने व सकारात्मक विचाराने वागत असतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच आदर असतो. स्व.डॉ.द.शि. एरम, ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव हे उपाध्यक्ष समीर जोशी व सर्व संचालक मंडळाला सोबत घेवून बँकेच्या खातेदार सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत. तसेच सभासदांना अर्थसाक्षर बनवत बँकेच्या प्रगतीबरोबर खातेदार सभासदांची सुद्धा प्रगती केली असून कराड अर्बन बँक ही आज सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून कार्यरत आहे, आणि अशा आदर्श संस्थेचे आपण सभासद खातेदार असल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्वार सभासद खातेदारांनी या मेळाव्यात व्यक्त केले.
बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिन्मय एरम, अर्बन बझार व डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्री गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच खातेदार सभासदांनी मनोगत व्यक्त करत असताना अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कराड अर्बन बँकेने ग्राहकसेवेत व इतर उत्पन्नामध्ये वाढ करण्याकरता धनकवडी (पुणे), तळभाग (कराड) व पोवई नाका (सातारा) या शाखांद्वारे नव्याने सुरू करण्यात आलेल्या फ्रैंकिंग सेवेच्या परवान्यांचे साहा. महाव्यवस्थापक सुहास पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व सदरच सेवेचा शुभारंभ बँकचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम व ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मेळाव्यास उपस्थितांचे आभार बँकेचे महाव्यवस्थापक दीपक आफळे यांनी मानले.
कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा....
बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष एरम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व ग्राहक सभासद उपस्थित होते. यावेळी सांगली शहर शाखेचे ग्राहक समिती सदस्य प्रमोद सारडा यांनी डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेसाठी रक्कम रू.२ लाखांच्या देणगीचा चेक संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिन्मय एरम व उपाध्यक्षा जयश्री गुरव यांच्याकडे सुपूर्द केला.

Comments
Post a Comment