मनोहर शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..


मनोहर शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...

कराड, दि. 7 (प्रतिनिधी) मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती, कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर भास्करराव शिंदे यांचा वाढदिवस मंगळवार, दि. ९ रोजी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मनोहर शिंदे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करणेत आले आहेत.

लक्ष्मीनगर मलकापूर येथे सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व यशवंत ब्लड बँकेच्यावतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी १०० पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. उद्या ८ जानेवारी रोजी लक्ष्मीनगर येथे गांधी फौडेशन, कराड व सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर होणार असून, यात गरोदर माता तपासणी, नेत्रतपासणी, रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी, ईसीजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळात होणार आहेत.

मंगळवार, दि. ९ रोजी सकाळी ९.३० वाजता मदरसा जियाउल कुरआन, प्रीतिसंगम मंगल कार्यालयाजवळ, मलकापूर येथे विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य व फळवाटप नगराध्यक्ष सौ. नीलम येडगे, नगरसेविका सौ. नंदा भोसले व सौ. अलका जगदाळे यांच्या हस्ते करणेत येणार आहे. १०.३० वाजता बालसुधारगृह केंद्र, शास्त्रीनगर मलकापूर येथे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चाद, सभापती नियोजन विकास व शिक्षण समिती, नगरसेविका सौ. गितांजली पाटील यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य व फळ वाटप करणेत येणार असून, ११.०० वा. द.शि. एम मूकबधीर विद्यालय, सैदापूर येथील विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे चनारायण रैनाक, नगरसेवक यांच्या हस्ते होणार आहे. 

मंगळवार, दि. ९ रोजी वाढदिवसानिमित्त गोकाक सहकारी पाणीपुरवठा कार्यालयात मनोहर शिंदे हे दुपारी १ नंतर शुभेच्छा स्वीकारणार आहेत. मनोहर शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये मित्र परिवार व हितचिंतकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. नीलम येडगे व बांधकाम सभापतीराजेंद्र यादव यांनी केले आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक