समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे : डॉ. अतुलबाबा भोसले....

कराड : मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनप्रसंगी डॉ. अतुलबाबा भोसले. बाजूस एस. ए. माशाळकर व सुहास जगताप.

समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे : डॉ. अतुलबाबा भोसले....

कराड येथे मराठी पत्रकार दिन सोहळा उत्साहात...

कराड, दि 6: सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार करत असतात. समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कराड येथे मराठी पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर व कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

त्यानंतर बोलताना डॉ. भोसले म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. मराठी पत्रकारितेत अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्याच पाऊलवाटेवर वाटचाल करत समाजभान जागृत करण्याचे काम आजचे पत्रकार करत आहेत. पत्रकारिता जोपासत असताना पत्रकारांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. पत्रकारांना आरोग्यविषयक मदतीसाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सदैव सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रसिद्धी अधिकारी सुशील लाड यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कारखान्याचे प्रसिद्धी अधिकारी अतुल मुळीक यांनी आभार मानले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक