बोगस नंबर प्लेट लावुन फिरणारा मोटार सायकल चोरटा कराड वाहतुक शाखेच्या ताब्यात...


बोगस नंबर प्लेट लावुन फिरणारा मोटार सायकल चोरटा कराड वाहतुक शाखेच्या ताब्यात...

कराड दि.6- कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक नियमांना संदर्भात कारवाई करत असताना सैदापूर कॅनॉल येथे एक दुचाकीस्वार बोगस नंबर प्लेट लावून फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिक चौकशीअंती सदरची दुचाकी सातारा येथून चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दिनांक पाच जानेवारी रोजी वाहतुकीवर काम करत असणारे अमंलदार पो हवा ४५३ साळुंखे, पो हया २१९५ चव्हाण, पो.कॉ. ८७४ चव्हाण यांना सैदापुर कैनोल कराड याठिकाणी कर्तव्य नेमण्यात आले होते. वाहतुकीचे नियमण व वाहन चेकींग करत असताना संबधीत अमलदार यांनी ओगलेवाडी कडुन येणारी नोबेल रेड कलरची मोपेड गाडी वरील चालक यांना इशारा करुन बाजुला घेवुन सदर चालकास नाव व गाडीचे कागदपत्रा बाबत माहिती विचारली असता सदर चालकाने आपले नाव सागर कुंडलीक सांवत वय २५ वर्षे रा. किर्दतवस्ती दहीगाव ता. माळशिरस जि.सोलापुर सध्या रा. मंगळवार पेठ कराड असे सांगुन गाडीची कागदपत्रे नसले बाबत उडवाउडवीची व असमाधान कारक उत्तरे दिल्यामुळे सदरची मोटार सायकल चोरीची असावी असा संशय निर्माण झाल्यामुळे संबधीत अंमलदार यांनी सदरची हिरो कंपनीची डेस्टीनी १२५ मोपेड गाडी नंबर प्लेटवर असणारा नंबर एम.एच.११ सी.यु.८२०३ या नंबरची नाकाबंदी अॅपवर खात्री केली असता सदर नंबर होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोडलचा नंबर येत असल्याने सदर डेस्टीनी १२५ गाडीची चेसी नंबर MBLJFW०५८KGD०२०७० व इंजिन नंबर JF१७EJKGD०१५५८ वरुन आरटीओ कार्यालय कराड वरुन सविस्तर माहिती घेतली असता सदर वाहनाचा मुळ नंबर एम.एच.११ सी.यु.२३८२ असा असुन सदर डेस्टीनी १२५ मुळ मालक दिपक शिवराम कणसे रा. स्वराज नगर गोडोली सातारा मो.नं.७६६६३८९८२७ अशी माहिती मिळुन आल्याने मुळ मालाकाशी मोबाईल वर संपर्क केला असता सदरची हिरो कंपनीची डेस्टीनी १२५ गाडी हि सन २०२२ मध्ये चोरीस गेली असल्याची सांगुन त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४१३/२०२२ भादवि ३७९ प्रमाणे दि.१७/०५/२०२२ रोजी दाखल केले असल्याबाबतची माहिती मिळुन आली. या बाबत पुढील योग्य ती कार्यवाहीसाठी सातारा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वाहतुक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी चेतन मछले यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पो. हवा. सुरेश सावंत, पो. हवा. संतोष पाटणकर, पो. हवा. सचिन सांळुखे, पो, हवा शरद चव्हाण, पो.कॉ. सुधीर जाधव, पो, कॉ. सागर चव्हाण, पो.कॉ. नवनाथ पाटील यांनी केलेली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक