कराड शहर पोलीस ठाणेची दमदार कामगीरी... चोरीस गेलेले गहाळ मोबाईलचा शोध घेउन मुळ मालकांना केले परत....
कराड शहर पोलीस ठाणेची दमदार कामगीरी... चोरीस गेलेले गहाळ मोबाईलचा शोध घेउन मुळ मालकांना केले परत....
कराड दि.4- कराड शहरात ठीक ठिकाणी गतकाही महिन्यात अनेकांच्या मोबाईलची चोरी झाली होती, काही मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी सायबर सेलच्या मदतीने तपास करून अनेक मोबाईल हस्तगत करून ते वरिष्ठांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणे सन 2022-2023 पासून नागरीकांचे वापरात येणारे मोबाईल फोन ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कराड शहर पोलीस ठाणेकडील पो कॉ व नं 101 संग्राम मारुती पाटील यांना कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल तसेच चोरीच्या गुन्हयातील मोबाईल याचे सायबर पोलीस ठाणे यांचे मार्फतीने तांत्रीक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल फोनचा शोध घेउन ते नागरीकांना परत करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणे कडील पो हवा व नं 384 विजय मुळे, पो हवा च नं 730 सुनिल पन्हाळे, पो हवा व नं 24 अमोल साळुंखे, पो ना 1223 कुंभार, पो ना किशोर तारळकर, पो ना संदे, पो काँ दिग्वीजय सांडगे, पो कॉ अमोल देशमुख पो कॉ मुकेश मोरे यांना मोबाईल फोन शोध कामी नेमण्यात आले होते. नमुद पथकाने सायबर पोलीस ठाणे सातारा यांचे मदतीने कराड शहर हददीतुन तसेच सातारा, कोल्हापुर व कर्नाटक राज्यातुन परीसरातून मोबाईल फोन ताब्यात घेणेस पथकास यश आले आहे.
सदर मोहीम पो.अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सहा. पोलीस निरीक्षक गोरड, सपोनि विभुते तसेच पोलीस ठाणेतील पो का 101 संग्राम पाटील, कडील पो हवा विजय मुळे, पो हवा सुनिल पन्हाळे. पो हवा अमोल साळुंखे, पो ना कुंभार, पी ना किशोर तारळकर, पो ना संदे, पो कॉ दिग्वीजय सांडगे, पो कॉ अमोल देशमुख, पो कॉ मुकेश मोरे यांनी सदरची कारवाई कामी मदत केली आहे.
आज रोजी लोकांचे गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल फोन मिळुन आलेने नागरीकांना त्यांचे मोबाईलचे कागदपत्राची ओळख पटवून वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी व पोलीस ठाणे मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे व उपस्थितीत नागरीकांचे मोबाईल फोन त्यांना परत करण्यात आले. नागरीकांना त्यांचे हरवलेले/चोरीस गेलेले मोबाईल फोन हे परत मिळतील याची अपेक्षा नसताना पो कॉ संग्राम पाटील यांनी नागरीकांचे मोबाईल शोधुन दिल्याने नागरीकांना त्यांचे मोबाईल फोन मिळालेने त्यांनी समाधान व्यक्त करुन कराड शहर पोलीस ठाणेकडील उपक्रमाची प्रशंसा केली आहे. नागरीकांना त्यांचे गेलेले मोबाईल परत मिळाल्याचा आनंद त्यांचे चेहऱ्यावर दिसुन आला. सदरची मोहीम भविष्यात देखील राबवण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment