कृष्णा कारखान्याकडून प्रतिटन १०० रुपये ऊसबिल जाहीर...

 


कृष्णा कारखान्याकडून प्रतिटन १०० रुपये ऊसबिल जाहीर...

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार वर्ग...

शिवनगर दि. 2: रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३ या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. 

कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. या हंगामात कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, ११ लाख ८० हजार क्विंटल साखर पोती निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे.

कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना ३००० रुपयांचे ऊसबिल अदा केले आहे. तर आता पुढील ऊसबिल प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक