कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्रदान...


कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्रदान...

कराड दि.6- शिक्षक दिनानिम्मित नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.केशव सांगळे यांना 'राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार २०२३' प्रदान करण्यात आला आहे.

डॉ.केशव सांगळे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड मधून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी १९९७ तसेच पदव्युत्तर पदवी १९९९  मध्ये संपादित केली आहे. डॉ. सांगळे हे मुळगाव अहमनगर जिल्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वेळू गावचे आहेत. सध्या डॉ.केशव सांगळे हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था(V.J.T.I) मुंबई येथे स्थापत्य अभियांत्रिकी चे प्राध्यापक तथा अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.

डॉ.केशव सांगळे यांनी आपल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हंटले आहे कि , माझ्या या यशामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड चे मोलाचे योगदान लाभलेले आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड नियामक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग, प्राचार्य डॉ.संजीव वाघ, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.लक्ष्मण एल. कुमारवाड ह्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉ.केशव सांगळे यांचे अभिनंदन केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक