मलकापूर - कराड हद्दीतील महामार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे;शिवसेनेची मागणी...
मलकापूर - कराड हद्दीतील महामार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे;शिवसेनेची मागणी...
कराड दि.12-पुणे बेंगलोर महामार्गावरील मलकापूर व कराड हद्दीतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या हद्दीतील रस्त्याची डांबरीकरण करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने संबंधित कंपनीकडे देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की मलकापूर-कराड हद्दीतील महामार्गावरील खड्डे व रस्त्याची दुरावस्था तसेच प्रचंड प्रमाणात होत असलेले धुळीचे प्रदूषण याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने ना. नितीन गडकरी तसेच डी. पी. जैन कंपनीला निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. दि.२७ जुलैला ना. गडकरी यांना पाठवलेल्या पत्रावर ३१ जुलैला नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने तात्काळ सदर रस्ता मेंटेन करावा अन्यथा अपघात झाल्यास मोटार वेहिकल ऍक्टनुसार संबंधित कंपनी व कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहील असे निर्देश दिले. त्यानुसार कंपनीला पुन्हा स्मरणपत्र देत सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने चालू करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
सदर निवेदनावर उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद पाटील, तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, दिलीप यादव, उपतालुकाप्रमुख संजय चव्हाण, शहाजीराव जाधव, अनिल चाळके, शहर प्रमुख मधुकर शेलार, शशिराज करपे, उपशहर प्रमुख निलेश सुर्वे, शाखाप्रमुख विद्यानंद पाटील, नरेंद्र लोहार यांच्या सह्या आहेत.

Comments
Post a Comment