चांदोली पाटण परिसरात भूकंपाचा धक्का...
सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचा धक्का...
कराड दि.16 (प्रतिनिधी) पाटण तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. आज सकाळी पावणे सात वाजता तालुक्यातील धरण परिसरातील गावात हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी 3.4 रिश्टरस स्केलचा भूकंपाचा धक्का कोल्हापूर येथील भूकंपमापन केंद्रात नोंदला गेला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू चांदोली धरणाजवळ असल्याची नोंद झाली आहे.या भूकंपाच्या धक्क्याने कुठेही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर, साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात देखील भूकंपाचा हा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून 15 किलाेमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता.

Comments
Post a Comment