लिबर्टीचे शिष्टमंडळ माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला....
"लिबर्टी"च्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांची घेतली भेट...
आ. चव्हाण यांच्याकडून आधुनिक व्यायाम शाळेसाठी 10 लाख निधीची ग्वाही...
कराड दि.19- : येथील क्रीडा क्षेत्रांमध्ये मोठं नाव लौकिक असलेल्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या संचालक शिष्टमंडळाने आज माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांची भेट घेऊन अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी निधी मिळण्यासाठी निवेदन पत्राद्वारे मागणी केली आहे. दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य क्रीडा आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली तर 10 लाख रुपयेचा निधी देण्याची शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
याप्रसंगी आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील सत्तर वर्षापासूनच्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडा क्षेत्रामधील कामकाजाबद्दल प्रशंसोदगार व्यक्त केले. तसेच लिबर्टी मजदूर मंडळाच्या संचालक मंडळाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन मंडळाच्या आधुनिक व्यायाम साहित्यासाठी निधीची मागणी केली. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्काळ राज्य क्रीडा आयुक्त यांच्याशी संपर्क साधला आणि 10 लाख रुपये निधी देण्याची लिबर्टी मजदूर मंडळाच्या शिष्टमंडळाला ग्वाही दिली आहे.
तसेच नव्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदीच्या कामे शासन स्तरावरील सर्व ते सहकार्य करण्याचे सांगून "लिबर्टी" मंडळाच्या कार्याबद्दल आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
सदर शिष्टमंडळामध्ये "लिबर्टी" मंडळाचे उपाध्यक्ष अरुणराव जाधव, ज्येष्ठ संचालक एड. मानसिंगराव पाटील, मुनीर सावकार, रणजीतनाना पाटील, रमेश जाधव, विजय गरुड, किशोर शिंदे, काशिनाथ चौगुले व खेळाडू उपस्थित होते.

Comments
Post a Comment