कराड नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज आता फलटण मुख्याधिकारी यांच्याकडे....

 


कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना कराड पाटण नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडण्याचे आदेश...

कराड दि.10 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी जूनमध्ये शंकर खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी पदाचा चार्ज ही स्वीकारला. काही त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये त्यांची पदोन्नती झाली. या पदोन्नतीनुसार त्यांची अकोला महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाल्याची आदेश काढण्यात आले. त्यावेळी खंदारे यांनी या पदोन्नती बाबत दिलेल्या ठिकाणी चार्ज घेण्याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली नव्हती. त्याबाबत आज पर्यंत यावर चर्चा सुरू होती. मात्र गेली तीन दिवस झाले खंदारे मुंबई येथे तळ ठोकून होते. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आज त्यांच्याकडे असणारा कराड नगरपरिषदेचा व पाटण नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडण्याबाबतचे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी काढले.

दरम्यान आज आलेल्या आदेशानुसार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना त्यांच्याकडे असलेला कराड व पाटण येथील मुख्याधिकारी पदाचा चार्ज व त्यातून कार्यमुक्त होण्यासाठीचे आदेश आज सातारा जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे देण्याबाबत आदेश पारित झाले आहेत. त्यानुसार कराड व पाटण नगरपरिषदेचा चार्ज पुढील आदेश येईपर्यंत कराड मुख्याधिकारी पदाचा चार्ज फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे तर पाटण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी सहाय्यक आयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालयातील अजिंक्य पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

गेल्या दोन महिन्यात सातारा जिल्ह्यातील बहुतांशी नगरपरिषदेतील मुख्याधिकारी पदांच्या चार्ज बद्दल चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नगरपरिषद म्हणून कराड नगरपरिषदेचा उल्लेख केला जातो. आणि याच नगरपरिषदेत गेली बराच काळ मुख्याधिकारी पद रिक्त होते. त्यानंतर खंदारे यांची या पदावर बदली झाली. मात्र महिना होण्यापूर्वीच त्यांची पदोन्नतीने अन्य ठिकाणी बदली झाल्याचे आदेश आले. मात्र खंदारे त्या ठिकाणी हजर होण्यापूर्वी कराड व पाटण नगर परिषदेचा त्यांच्याकडे चार्ज होता. आज आलेल्या आदेशानुसार तो चार्ज अन्य अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले. 

आज प्राप्त झालेल्या आदेशानुसार आता कराड मुख्याधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी कराड मुख्याधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याची अद्यापही अधिकृत घोषणा अथवा आदेश प्राप्त झालेला नाही. असे असले तरी आज मुख्याधिकारी शंकर खंदारे कराड नगरपालिकेत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान या आलेल्या आदेशाबाबत कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक