कराडच्या कचेरीतील रेकॉर्डरूम मधील कारभारा विरोधात मुख्यमंत्र्याकडे तक्रार...
कराडच्या कचेरीतील रेकॉर्डरूम मधील कारभारा विरोधात मुख्यमंत्र्याकडे तक्रार... तक्रारीची तात्काळ दखल... दोघांची कामे मार्गी...
कराड दि. 25 (प्रतिनिधी) येथील तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्डरूम मधून नागरिकांची होणारी पिळवणूक व अनगोंधा कारभार चव्हाट्यावर आला आहे. याची तक्रार आपले कराड ग्रुपच्या वतीने संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केल्याने या तक्रारीची तात्काळ दखल घेत अधिक चौकशी करणे कामी संबंधित तक्रार महसूल सचिवाकडे पाठवल्याची माहिती संजय चव्हाण यांना प्राप्त झाली आहे. दरम्यान या तक्रारीची तात्काळ दखल घेत आपले कराडकडे दाखल दोन तक्रारदारांची कामे झाल्याने त्यांनी आपले कराड ग्रुप व संजय चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान प्रशासकीय कार्यालयातील अनेक विभागांच्या ऑफिसमध्ये दस्तर खुद्द प्रांताधिकारी, तहसीलदार व या विभागाचे नायब तहसीलदार यांची जबाबदारी आहे, की आपण अशा गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही व प्रशासकीय कार्यालयातून सर्व येणाऱ्या अभ्यागताची कामे विना तक्रार झाली पाहिजेत. अशा बाबतीत नियोजन करण्याची जबाबदारी आहे. विशेष करून शेतू कार्यालय व अन्य महत्त्वाच्या नोंदी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कचेरीतील रेकॉर्ड रूममध्ये जुन्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी अनेक जण अर्ज करीत आहेत. मात्र रेकॉर्ड रूम मधून अनेक वेळा अर्जदारांना नाहक त्रास देण्याचे तसेच कागदपत्रे उपलब्ध नसल्याची उत्तरे मिळत होती. एक प्रकारे अर्जदारांची पिळवणूक केली जात आहे. गत काही दिवसापूर्वी एका वकील व एका तरुणीने या रेकॉर्ड रूम कडे जुन्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जाची दखल न घेता नाहक त्रास देण्याची काम सुरू होते. त्यामुळे या दोघांनी सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. चव्हाण यांनी प्रत्यक्ष या विषयाची माहिती, पुरावे घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.
आपले कराड ग्रुपच्या संजय चव्हाण यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कराड तहसीलदार कार्यालयात असणाऱ्या रेकॉर्डरूम मध्ये जनतेस जुन्या कागदपत्रांच्या नकला मिळताना जनतेची अत्यंत पिळवणूक चाललेली आहे. येथे पूर्णपणे माफियाराज चालू आहे. आम्हाला तर असे वाटते की जनतेचे अत्यंत निकडीचे जुने रेकॉर्ड चुकीच्या व्यक्तींच्या ताब्यात गेलेले आहे. या रेकॉर्डरूम मध्ये काही खाजगी लोक सुद्धा रेकॉर्ड हाताळत असतात. एखाद्या नागरिकांनी संबंधितांकडे रीतसर अर्ज करून कागदपत्रांची मागणी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. नागरिकांनी दिलेल्या अर्जावर त्यांना पोहच सुद्धा दिली जात नाही..
नागरिकांना जुने रेकॉर्ड सरकार दरबारी व न्यायालयात सादर करायच असते त्यामुळे नागरिकांची ही निकड बघून या ऑफिस मधील लोक यात काही खाजगी लोक सुद्धा जनतेची अडवणुक करतात आणि रेकॉर्ड रूम मध्ये रेकॉर्ड असताना सुद्धा काही वेळेस हे रेकॉर्ड सापडत नाही असे रेटून सांगत असतात. त्यामुळे या लोकांकडून सरकारचे ताब्यात असणारे हे जुने रेकॉर्ड या लोकांकडून गहाळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने त्वरित याबाबत योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. कराड तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्ड रूम मध्ये जनतेला कागदपत्रांच्या नकला मिळताना सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत पिळवणूक चाललेली असून या कार्यालयातील असणाऱ्या लोकांचे विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत कारण आपण जर तक्रार केली तर आपणाला अनमोल असणारे रेकॉर्ड हे ऑफीस मधील लोक गहाळ करतील या दबावाखाली असतात त्यामुळे या चाललेल्या माफीयाराज विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक पुढे येत नाहीत. या कार्यालयात काही लोकांनी सकाळी अर्ज दिले तरी तासाभरात त्यांना हव्या असलेल्या रेकॉर्डच्या नकला युद्धपातळीवर मिळतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ही बाब या कार्यालयातील आवक जावक रजिस्टर चेक केले तरी समजेल. आणि सर्वसामान्य जनतेला मात्र हे लोक महिनो महिने हेलपाटे घालायला लावतात
सर्वसामान्य जनतेवर या कार्यालयात होत असलेल्या अत्याचाराबाबत या कार्यालयातील खाजगी व सरकारी लोकांची खातेनिहाय चौकशी ही झालीच पाहिजे तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आमचे संघटने कडे या कार्यालयात होत असलेल्या अडवणुकीबाबत दोन नागरिकांनी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या प्रती या इमेल मध्ये जोडल्या आहेत. तसेच या कार्यालयात काम करत असलेल्या लोकांचे काल कार्यालयात समक्ष फोटो काढलेले आहेत ते फोटो सुद्धा या इमेल मध्ये जोडलेले आहेत यातील शासकीय कर्मचारी कोण व खाजगी व्यक्ती कोण याची खात्री जमा झाली पाहिजे आणि या खाजगी व्यक्तींना शासकीय रेकॉर्ड हाताळण्यास कोणी परवानगी दिली त्यांची सुद्धा खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे संघटने कडे तक्रार करणारे सदस्यांपैकी बापूनाथ बनसोडे हे वकील आहेत. अशा व्यक्तीची अडवणुक होत असेल तर सर्वसामान्य जनतेची हे या कार्यालयातील लोक किती ससेहोलपट करत असतील याचा कृपया अंदाज घ्यावा.
कराड तालुक्यातच नव्हे तर राज्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी वरील प्रकार चालू असण्याची शक्यता आहे त्यामुळे जनतेला आवश्यक असणारे जुने रेकॉर्ड या पद्धतीच्या माफियांकडून नष्ट होण्याचे आधी राज्यातील जुने सर्वच रेकॉर्ड युद्धपातळीवर स्कॅनिंग होऊन कॉम्प्युटर मध्ये जतन करणे बाबत कार्यवाही होणेस नम्र विनंती आहे.

Comments
Post a Comment