एच.के.डी.अंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये विविध उपक्रमाने स्वतंत्रता दिन साजरा...
एच.के.डी.अंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये विविध उपक्रमाने स्वतंत्रता दिन साजरा...
कराड दि. 16 (प्रतिनिधी) येथील एच. के. डी. अंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये स्वतंत्रता दिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी के. एम. एज्युकेशन सोसायटीचे सचिव रशीद अहमद अरब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विध्यार्थी व विध्यार्थिनीनी या दिनाच्या निमित्ताने भाषणे व गीते सादर केली.
दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संचालक सलीम भाई मुजावर व स्कूल कमिटीचे चेअरमन इरफान भाई सय्यद यांच्या आर्थिक सहायातून तयार केलेल्या इ. १० वी च्या नवीन डिजिटल वर्गाचे उदघाटन सलीम भाई मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमांतर्गत माझी माती माझा देश या अभियानातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेच्या आवारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास के. एम. एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजू अरब, संस्थेचे संचालक अल्ताफ हुसेन मुल्ला, सलीम भाई मुजावर शाळेचे मुख्याध्यापक रियाज इरकल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न. प. स्कूल न. ५ चे मुख्याधिपिका श्रीमती अंजुम काजी तसेच शहरातील फिरोज मुल्लाणी, मकसूद मोमीन, इम्रान मोमीन, मौलाना तय्यब, हाफिज शादाब मोमीन उपस्थित होते.



Comments
Post a Comment