सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट कराल तर महागात पडेल; महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ नुसार नोटीस...
सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट कराल तर महागात पडेल; महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ नुसार नोटीस...
कराड दि. 18 (प्रतिनिधी) सोशल मीडियावर विविध स्वरूपाच्या पोस्ट त्यामध्ये आक्षेपार्य, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट यांचा समावेश असू शकतो, त्यामुळे त्या माध्यमातून समाजात तेड निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ नुसार आज नोटीस जारी करण्यात आली असून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी व त्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करावा असे आव्हान सातारा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्याअर्थी, असे मानन्यास मला पुरेसे कारण आहे की, दिनांक १५/०८/२०२३ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज व भारत देशाबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणा-या इसमाविरुध्द सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६४८/२०२३ भा.द.वि.क. २९५ (अ), १५३ (ब), ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने लोकांचे मध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज आपल्याकडुन सोशल मिडीया/व्हॉटसअप/फेसबुक/हॅलो / टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही डीजीटल माध्यमांमध्ये दोन समाजात जातीय/धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश / साहीत्य / चित्रफित इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समुहामध्ये प्रसारीत करणार नाही. तसेच जातीय वैमनस्य / धार्मिक तेढ/समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या अनधिकृत / खोटया बातम्या कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीचा समुहात प्रसारीत करणार नाही. अशा स्वरुपाचे मेसेज आपल्याकडुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्यास मी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ नुसार प्राप्त अधिकारान्वये प्रतिबंध करीत आहे. असे कृत्य केल्यास ते कृत्य करणा-यास अगर त्या समुहाच्या ग्रुप अॅडमीनवर महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय दंड सहिंता व इतर कायदयानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
टिप :- ग्रुप अॅडमीन आत्ताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सुचना दयाव्यात तसेच सेटींगमध्ये जाऊन फक्त ग्रुप अॅडमीन मेसेज सेंड करेल असे सेटींग करावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी सातारा शहर उपविभाग, सातारा यांनी केली आहे.

Comments
Post a Comment