कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद...

 

कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद...

कराड दि.19- येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे’ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीने या शिबिराचे आयोजन अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.एस.जे.वाघ, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.डॉ.के.एन.अळसुंदकर प्रा. डॉ.एस.के.पाटील, प्रा. डॉ.एस.एच.पवार, प्रा. डॉ.अनिल आचार् तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. के. एन. अळसुंदकर यांनी केले. यावेळी स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश शिंदे यांनी रक्तदान करताना घ्यावयाची काळजी याविषयी अत्यंत बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक रक्तदान शिबीराचे नियोजन केले.

या रक्तदान शिबीराला सर्व विभागांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त दात्यांसाठी महाविद्यालयातर्फे अल्पोहारची सोयही करण्यात आली होती. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी याप्रसंगी ७१ बाटल्या रक्तदान केले. 

शिबिराच्या माध्यमातून जमा झालेले रक्त वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीकडे देण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ.के.एन.अळसुंदकर तसेच प्राचार्य डॉ.एस.जे.वाघ यांनी याप्रसंगी रक्तदान शिबिरास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक