कराड नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचा तसेच पोलिसांचा सन्मान...
कराड नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचा तसेच पोलिसांचा सन्मान...
कराड दि. 14-आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" देशभरात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यामध्ये "मेरी माटी, मेरा देश" (मिट्टी को नमन, वीरो को वंदन) या अभियानाअंतर्गत 'स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन' हा कार्यक्रम स्व. यशवंतरावजी चव्हाण स्मृतिसदन सभागृहात आज उपस्थित सत्कारमूर्तींचा सन्मान करून संपन्न झाला.
या कार्यक्रमात कराड शहरातील ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले त्या स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्य आणि सुरक्षेसाठी देशसेवा केलेल्या निवृत्त माजी सैनिक, लष्कर अधिकारी तसेच पोलीस दलात विशेष कामगिरी केलेल्या पोलीस अधिका-यांचा व कर्मचा-यांचा सन्मान नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक, नगरपरिषद अधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांचेकडून उपस्थिताना देशाप्रती असणा-या नागरिकांच्या कर्तव्यांचा गौरवाचा, संरक्षणाचा सन्मान आणि प्रगतीबाबत पंच प्रण (शपथ) देण्यात आली.
सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक विनायक पावसकर, फारुख पटवेकर, सौ. विद्या पावसकर, प्रदीप जाधव, प्रमोद वेर्णेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपमुख्याधिकारी सौ. विशाखा पवार, नगर अभियंता रत्नारंजन गायकवाड, आरोग्य अभियंता रफिक भालदार, पाणीपुरवठा व जलनि:सारण अभियंता अशोक पवार, कर निरीक्षक उमेश महादर, भांडारपाल संजय शिखरे, ग्रंथपाल संजय शिंदे, संगणक अभियंता राम गायकवाड, कनिष्ठ अभियंता मुरलीधर धायगुडे, स्वच्छता शहर समन्वयक आशिष रोकडे व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता मेहनत घेतेलेल्या, वेळेप्रसंगी हौतात्म्य व तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती देशाच्या सुरक्षेसाठी देशसेवा केलेल्या निवृत्त माजी सैनिकांप्रती या घडीला निष्ठेने विशेष कामगिरी पार पाडत असणा-या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कराड नगरपरिषदेकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 104 स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा शाल, गुलाबपुष्प, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी अनेकानी आपले मनोगत व्यक्त करून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कराड नगरपरिषदेचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व जलनि:सारण अभियंता अशोक पवार, सूत्रसंचालन पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचारी माणिक बनकर व आरोग्य अभियंता रफिक भालदार यानी आभार मानले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Raju Sanadi Karad-9822308552




Comments
Post a Comment