पशुधन वाचविण्यासाठी माण, खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी...


पशुधन वाचविण्यासाठी माण, खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी...

कराड: दि.15-सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. या गावांमध्ये जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने या भागात तात्काळ चारा छावण्या सुरु करण्याबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मदत-पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. 

सातारा जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पाऊस पडला असला तरी माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. माण व खटाव तालुक्यातील दुष्काळजन्य गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये तात्काळ चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे, तसेच पशुधन वाचविण्यासाठी या दुष्काळग्रस्त भागात त्वरित चारा छावण्या सुरु करण्याकरिता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून चारा छावण्या सुरु करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक