कराड रेल्वे स्टेशनवर मिरज निजामुद्दीन (दर्शन एक्सप्रेस) चे स्वागत...

 

कराड रेल्वे स्टेशनवर मिरज निजामुद्दीन (दर्शन एक्सप्रेस) चे स्वागत...

कराड दि.20 (प्रतिनिधी) प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन मिरज (दर्शन एक्सप्रेस) रेल्वे अखेर आज कराड व सातारा येथे थांबल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. कराड येथे आज या एक्सप्रेसचे सकाळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सल्लागार सदस्य श्रीनिवास डूबल, योगेश मालाणी, राजेंद्र लाहोटी, सचिन ओसवाल, सज्जन राजपूत, प्रशांत पंचारिया उपस्थित होते. आज सकाळी ठरलेल्या वेळेत सदर एक्सप्रेस आल्यानंतर या एक्सप्रेसचे लोको पायलेट अरविंद्र कुमार व असिस्टंट लोको पायलट अमित मिश्रा यांच्यासह प्रवाशांचे हार बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

दर्शन एक्सप्रेस दर रविवारी कराड वरून सकाळी 6.02 वाजता सुटणार आहे. ही रेल्वे सातारा 7.07, जेजुरी 8.43, पुणे 11.0, लोणावळा 12.03 कल्याण जंक्शन 13.22, वसई रोड 14.20, वापी 15.43, सुरत 16.52, वडोदरा 18.28, रत्नालाम 21.55, कोटा 00.55 व हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 ला पोहोचणार आहे. ही रेल्वे 26 तासांमध्ये कराड हुन दिल्लीला पोहोचणार आहे.

दर्शनी एक्सप्रेस मुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच परतीचा प्रवासासाठी दर शुक्रवारी रात्री निजामुद्दीन वरून 21.40 वाजता आहे. ही गाडी कोटा ज.2.20, रत्नल्लम 5.50, वडोदरा 9.27, सुरत 11.17, वसई रोड 14.7, कल्याण जंक्शन पंधरा 15.17, लोणावळा 16.58, पुणे 18.30, सातारा 21.42, व कराडला 22.37 ला पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी दिली. 

भविष्यात दुहेरी रेल्वे लाईन झाल्यानंतर काही गाड्या कराड रेल्वे स्टेशन वरून वाढणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी जास्तीत जास्त रेल्वेचा पर्याय निवडावा अशी विनंती ही गोपाल तिवारी यांनी केली आहे. सदर गाडीला सातारा व कराड येथे थांबा देण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक