कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला शिरवळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट...
कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला शिरवळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट...
कराड दि. 17-स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात देशामध्ये आणि राज्य पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या कराड नगरपालिकेला देशपातळीवरील मानांकन मिळाले आहे. त्या अंतर्गत आज शिरवळ ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक संस्थेचे सदस्य यानीं आज कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास व मलनिस्सारण प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली. या प्रकल्पाची पाहणी करत सध्या सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
कराड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सर्वाचे स्वागत केले. यावेळी शिरवळचे सरपंच रविराज मधुकर दुधगावकर, उपसरपंच ताहरे अब्दुल रहीम कासी , ग्रामसेवक बबनराव धायगुडे , गुरुदेव बरदाडे सभापती खंडाळा, प्रदिप माने सातारा उपजिल्हा प्रमुख शिवसेना, समीर काझी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिरवळ, चंद्रकांत मगर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष, ज्ञानेश्वर भांडे शिवसेना शहर प्रमु, राहुल कांबळे RPI खंजळा युवा अध्यक्ष, गोपीनाथ बोडरे - सामाजिक, विजय गिरे शिवसेना शहर प्रमुख व ठाकरे गट या सर्व सदस्यांनी कराड नगरपरिषदेच्या कामगिरी बद्दल प्रशंसा केली.
दरम्यान शिरवळ ग्रामपंचायत अभ्यास दौरा करिता सर्व पक्षाचे पदाधिकारी, शिरवळचे विकासासाठी एकत्र एकवटलेचे दिसून आले. याप्रसंगी उप-मुख्यअधिकारी विशाखा पवार, नगर अभियंता आर डी गायकवाड, आरोग्य अभियंता आर डी.भालदार, जल निस्सारण अधिकारी ए.आर.पवार, आरोग्य अधिकारी मिलिंद शिंदे सर्व विभागीय अधिकारी, हेड-मुकादम मारुती काटरे व अन्य विभागाचे मुकादम, कर्मचारी उपस्थित होते.




Comments
Post a Comment