कराडात लंपी त्वचा रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजारावर व वाहतुकीवर बंदी...

 

कराडात लंपी त्वचा रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजारावर व वाहतुकीवर बंदी...

सातारा दि.28 : गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर  या शेजारील जिल्हयात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या  वाहतुकीवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे  आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.  

या आदेशानुसार  जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच गोवर्गीय जनावरांची वाहतूक करणेत येवू नये. जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन पुढील आदेश होईपर्यंत करणेत येऊ नये.

फलटण, कराड, कोरेगाव व माण या तालुक्यातील 9 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये 26 गाय व 15  बैल असे एकूण 41 जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यु झाला असून 3 जनावरे नियमित औषधाने बरी झाली आहेत.

जिल्हयातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67  जनावरांचे लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करणेत येत आहे. रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी  पशुपालकांनी जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व वरचेवर गोचीडनाशक औषध फवारणी करावी. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. गावात जनावरांमध्ये रोग प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने किटकनाशक औषध फवारणी वरचेवर करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय सावंत केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक