कराडच्या सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयातर्फे इस्रोतील वैज्ञानिकांना अनोखे अभिवादन...
कराड दि.24-कराडच्या जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयाच्या वतीने चांद्रयान 3 च्या यशस्वितेसाठी विद्यार्थांनी इस्रोतील वैज्ञानिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
विद्यार्थांनी चंद्र, चांद्रयान 3 व इस्रो या अवकाश प्रक्षेपण केंद्राचा मानवी साखळीच्या माध्यमातून लोगोची रचना करून चंद्राच्या रचनेत भारताचा ध्वज तिरंगा फडकवून NOW INDIA ON MOON असे दर्शविले.
याप्रसंगी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेची माहिती तसेच विद्यार्थांनी केलेल्या रचनेची माहिती दिली. इस्रोने केलेल्या चांद्रयानच्या या यशस्वी मोहिमेतून तसेच विद्यार्थांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत होऊन व त्यातून प्रेरणा घेवून भविष्यात विद्यार्थांनी संशोधक, वैज्ञानिक होऊन इस्रोच्या कार्यात आपले योगदान देता येईल अशी कामगिरी करावी. अशी आशा व्यक्त करण्यात आली
शाळेच्या व विद्यार्थांच्या वतीने इस्रोतील सर्व वैज्ञानिकांना अभिवादन करून व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थांनी या प्रसंगी भारतमाता की जय, वंदे मातरम्, जय जवान - जय किसान - जय विज्ञान अश्या घोषणा दिल्या.
जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, सचिव अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. रुपाली तोडकर, सौ सोनाली जोशी यांनी प्रेरणा दिली. तसेच विजय कुलकर्णी, सौ.गौरी साळुंखे व दीपक पाटील व इयत्ता 9 वीच्या विद्यार्थांनी आखणी व आयोजन केले.

Comments
Post a Comment