विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यापकांनी सुद्धा अद्ययावत व्हावे;तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर...

 

मार्गदर्शन करताना तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर समवेत प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. बुरांडे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सिमिकेरी...

विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यापकांनी सुद्धा अद्ययावत व्हावे;तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर...

कराड दि.19- विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांच्यामधील कमतरता दूर करण्याचे काम हे अध्यापकांचे आहे. शासकीय संस्था या ब्रँड म्हणून ओळखल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा, आत्मीयता, सहकार्याची भावना वृद्धिंगत होणे गरजेचे असून विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते त्यास योग्य दिशा देण्यासाठी अध्यापकांनी सुद्धा अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले. डॉ. मोहितकर यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतन कराडला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. 

डॉ. मोहितकर पुढे म्हणाले,'राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुसरून पदविका अभियांत्रिकीचा 'के स्कीम' अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासूनच राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना १२ आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे.  तसेच मूल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करून योग आणि चिंतनविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.

नवीन पिढी तंत्रज्ञानाविषयी जागरूक असल्याने त्यांना योग्य दिशा देण्याचे काम प्राध्यापकांवर असल्याचे सांगून डॉक्टर मोहितकर म्हणाले, प्राध्यापकांनी प्रभावीपणे युवा कौशल्याचा वापर करून घ्यावा आणि नाविन्याचा ध्यास असलेले अभियंते घडवावेत.' असे आवाहन ही डॉ. मोहितकर यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने साकारणाऱ्या ऑक्सीजन पार्कचा शुभारंभ डॉ. मोहितकर यांनी केला. या उद्यानामध्ये देशी व प्राणवायू देणाऱ्या तुळस, आंबा, साग रोपांची लागवड करण्यात आली आहे. डॉ सुरेंद्र खवळे यांनी सूत्रसंचालन केले व उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सिमिकेरी यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक