कराड अर्बनची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, कराड अर्बनच्या सभासदांना ८% लाभांश- डॉ. सुभाष एरम...

कराड अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना बँकेचे चेअरमन डॉ. सुभाष एरम व इतर....

कराड अर्बनची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, कराड अर्बनच्या सभासदांना ८% लाभांश- डॉ. सुभाष एरम...

कराड दि.२०:-कराड अर्बन बँकेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज  बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि सर्व संचालक तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व सदस्यांसह सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बँकेसमोर प्रत्येक पंचवीस वर्षाच्या कालखंडानंतर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचा इतिहास असला तरी आपण तो समर्थपणे पेलत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकेने सर्व निर्धारित प्रमाणके पूर्ण केली आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रु. २०० कोटींची वाढ झाली असून बँकेने एकूण व्यवसाय रू. ४७५१ कोटींचा टप्पा दिमाखदारपणे पार केला आहे. यामध्ये रू. ३००७ कोटींच्या ठेवी तर रू. १७४४ कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला रु.५७.४५ कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु.१९.०६ कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सदृढता कायम राखली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.

बँकेने यावर्षी वसुलीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत नेट एन.पी.ए. चे प्रमाण २.८४% इतके राखले आहे. सभासदांना ८% लाभांश देत असल्याची घोषणा यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केली. त्याचप्रमाणे बँकेने डिजीटल व्यवहार सुरू करण्यानुषंगाने सरू केलेल्या व्हॉटस् अॅप बँकिंग व खात्यात रक्कम जमा करण्यासाठी क्यू आर कोडची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.

बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १७.११% राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. एकूण ६२ शाखांपैकी २२ शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के आहे असून निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण २.८४% इतके राहिले आहे. बँकेच्या ६२ शाखांपैकी एकूण ५७ शाखांनी नफा मिळवला असून २९ शाखांना रु. १ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. चालू आर्थिक वर्षात छोट्या रकमेचा पतपुरवठा केल्यामुळे बँकेचा ग्राहकपाया अधिक विस्तृत झाला आहे. एकंदर आर्थिक प्रगती पाहता, रिझर्व्ह बँकेने आर्थिक सक्षम व उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या (Finanbially Sound & Well Managed Banks) बँकासाठी लागू केलेल्या सर्व निकषांची पूर्तता कराड अर्बन बँकेने केली असल्याची माहिती माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी दिली. तसेच सन २०२२-२३ हे आर्थिक वर्ष भागभांडवल वृद्धीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये बँकेने भागभांडवलाचा रू. १०० कोटींचा टप्पा पार केला असून रू.१०० कोटींपेक्षा अधिक भागभांडवल असणाऱ्या देशात केवळ १२ बँका असून यामध्ये आपल्याही बँकेचा समावेश आहे, यातून बँकेवर समाजाचा असणारा अढळ विश्वास अधोरेखित होतो असे मत माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी व्यक्त केले.

बँकेने सन २०१७ साली विलिनीकरण करून घेतलेल्या सातारास्थित अजिंक्यतारा बँकेच्या १४ शाखांपैकी १० शाखांच्या रिलोकेशनसाठी रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२३ मध्ये परवानगी दिली. यानुषंगाने सर्व कार्यवाहीची पूर्तता करून दि. ४ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यामध्ये तळमावले (ता. पाटण) व पुसेसावळी (ता. कराड) या दोन आणि सांगली जिल्ह्यातील पलूस (ता. पलूस) या नवीन ठिकाणी शाखा सुरू केल्या असून दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी बारामती या नवीन ठिकाणी व सोलापूर येथे दुसरी शाखा सुरू करणार आहे. तसेच लोणंद (जि. सातारा), रत्नागिरी, जयसिंगपूर ( जि. कोल्हापूर), नागाळा पार्क कोल्हापूर व नन्हे (जि. पुणे) या पाच शाखा सप्टेंबर २०२३ अखेर सुरू करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढे संचालकांनी सादर केलेल्या सर्व विषयांना सभासदांनी मान्यता देवून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या शेवटी उपाध्यक्ष समीर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कराड अर्बनच्या सेवकांच्या पतसंस्थेचा व ट्रस्टचा मूकबधिर शाळेस मदतीचा हात....

कराड अर्बन बँकेच्या सेवकांसाठी असणाऱ्या दि कराड अर्बन सेवक पतसंस्थेकडून रू. ५,००,०००/- (रूपये पाच लाख फक्त) व कराड अर्बन कौटुंबीक सेवक सहाय्यता ट्रस्ट यांच्याकडून रू. १,११,१११/- (रूपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा फक्त ) असे एकूण रक्कम रू. ६,११,१११/- इतक्या देणगीचे चेक डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य संस्थेस देण्यात आले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक