जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभास प्रीतीसंगमावरून प्रारंभ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभास प्रीतीसंगमावरून प्रारंभ...
कराड दि. 14 (प्रतिनिधी) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभाचा येथील प्रीतीसंगमावरून शुभारंभ करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांच्यासह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी समाधीस अभिवादन केले व यानिमित्ताने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर प्रज्वलित करण्यात आलेली यशवंत ज्योत साताऱ्याकडे मार्गस्थ करण्यात आली.
बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बँकेने राबवलेले उपक्रमांची जिल्हाभर जनजागृती करून बँकेचा नावलौकिक वाढवण्याबरोबरच बँकेची प्रगती करण्याचा मनोज यावेळी संचालकांनी व्यक्त करून नाबार्डने गौरवलेल्या या बँकेचा देशभर नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यमान संचालक प्रयत्नशील असणार असल्याची ग्वाही दिली.
Comments
Post a Comment