कराड नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन...

 


कराड नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे उद्घाटन...

कराड दि.10 (प्रतिनिधी)  "मेरी माटी, मेरा देश" (मिट्टी को नमन, वीरो को वंदन) या अभियाना अंतर्गत कराड शहरातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील नगरपरिषद आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे माजी नगरसेवक तसेच मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थिताना आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांनी 'पंच प्रण (शपथ)' दिली. उद्घाटन झालेल्या शिलाफलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीरांच्या नावांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, रणजीत पाटील, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, उपमुख्याधिकारी विशाखा पवार, सहा. नगर रचना अधिकारी अंकिता पवार, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" देशभरात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यामध्ये "मेरी माटी, मेरा देश" (मिट्टी को नमन, वीरो को वंदन) हा उपक्रम राबविण्याचे शासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. या उपक्रमानुसार प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत 5 प्रमुख कार्यक्रम 'शिलाफलक', 'पंच प्रण ( शपथ घेणे', 'वसुधा वंदन', 'स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, वीरांना वंदन' व 'ध्वजारोहण कार्यक्रम' नगरपरिषद स्तरावर राबविण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम दिनांक 9 ते दिनांक 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान आयोजित केलेले आहेत.

'शिलाफलक' या उपक्रमाअंतर्गत कराड शहरातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कराड नगरपरिषद कार्यालय आवारामध्ये शिलाफलकाची उभारणी करण्यात आली आहे. सदर शिलाफलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीरांच्या नावांचा समावेश आहे. सदर शिलाफलकाचे उद्घाटन व त्यासोबतच देशाप्रती असणा-या नागरिकांच्या कर्तव्यांचा पुनरोच्चार करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच शहरवासीयांनी 'पंच प्रण (शपथ)' ही यावेळी घेण्यात आली.

'वसुधा वंदन' या उपक्रमाअंतर्गत देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे 75वे वर्ष संस्मरणीय करण्यासाठी वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड कराड शहरातील घनकचरा प्रकल्प परिसर, बारा डबरे या ठिकाणी दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.

'स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन' या उपक्रमाअंतर्गत कराड शहरातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या निवृत्त ( आर्मी, पोलीस दल), स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी स्थानिक पध्दतीनुसार (शाल, बुके, श्रीफळ व सन्मानपत्र) देवून सन्मान स्व. यशवंतरावजी चव्हाण स्मृतिसदन सभागृह, कराड या ठिकाणी दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजलेपासून करण्याचे आयोजन केलेले आहे.

'ध्वजारोहण कार्यक्रम' या उपक्रमाअंतर्गत कराड नगरपरिषद प्रांगणात कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शहराच्या हद्दीतील 1-2 मूठ माती कलश घेवून सन्मानपूर्वक कराड नगरपरिषद स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. 

'हरघर तिरंगा' मागील वर्षीप्रमाणे दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2023 या कालावधीत नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना वृद्धींगत व्हावी यासाठी प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हे करताना भारतीय ध्वजसंहितेमधील नियम पाळले जातील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. 

तरी, कराड शहरातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक व खाजगी संस्था यानी वरील कार्यक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावे व सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यात सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी शंकर खंदारे यानी केले आहे.

'हरघर तिरंगा' अंतर्गत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी लागणारे झेंडे नगपरिषद कार्यालयात विक्रीसाठी माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक