कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत 3 दुकानावर दंडात्मक कारवाई, 50 किलो प्लास्टीक जप्त...
कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत 3 दुकानावर दंडात्मक कारवाई, 50 किलो प्लास्टीक जप्त...
कराड दि.31 (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी शहरात सूरू आहे. आज बाजारपेठेत करण्यात आलेल्या तपासणीत बंदी असलेले प्लास्टिक सापडल्याने 3 दूकानदारांकडून 15 हजारांचा दंड वसूल करुन 50 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.
ही प्लास्टिक निर्मूलन मोहिम आरोग्य अभियंता तथा नोडल ऑफिसर आर. डी. भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सातारा फिल्ड आॅफिसर ए. एस.जगदाळे यांच्या उपस्थित ही प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील अनेक दूकांनाची तपासणी केली. या तपासणीत शनिवार पेठ, बस स्थानक परिसरातील दोन बेकरी, प्लास्टिक हाऊस या दूकानात बंदी असलेले प्लास्टीक आढळून आले. त्यामुळे या तिन्ही दुकानदारांवर प्रत्येकी पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टीक साहित्य तसेच 50 मायक्रोन प्लास्टीक पिशव्याचा समावेश आहे.
या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत नगरपरिषदेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, आरोग्य कर्मचारी बाबु चव्हाण, सोनु चव्हाण, सागर सातपुते, भास्कर काटरे सहभागी झाले होते.


Comments
Post a Comment