कराडात पाईपलाईन फुटली; कोल्हापूर नाक्यावर पाणीच पाणी...
कराडात पाईपलाईन फुटली; कोल्हापूर नाक्यावर पाणीच पाणी...
कराड दि.7 (प्रतिनिधी) मलकापूरच्या गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला आज रात्री महामार्गावरील खरेदी विक्री संघच्या पेट्रोल पंपा समोरील भागात मोठे लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर पाणी साचले. सदरचे पाणी लिकेज झालेल्या भागापासून कोल्हापूर नाक्यावरील स्वागत कमाने पर्यंत वाहत होते. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
गोकाक पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे कडून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन या भागात महामार्ग परिसरात आहे. सदर पाईपलाईन खरेदी विक्री संघापासून पासून हौसाई कन्या शाळा या परिसरातील आहे. सायंकाळी उशिरा अचानक ही पाईपलाईन ब्रुस्ट झाली. त्यामुळे पाणी महामार्गावरून कोल्हापूर नाक्यापर्यंत वाहत होते. कोल्हापूर नाक्यावर आय लव यू पॉईंट समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. यावेळी डी पी जैनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत. साचलेल्या पाण्याला मार्ग काढण्याचे कारवाई सुरू केली.
या परिसरात गोकाक पाणीपुरवठा सहकारी संस्थेची पाईपलाईन असून त्यावरती संबंधितांनी माहिती घेऊन बांधकाम अथवा खोदकाम करावे असे आव्हान गोकाक पाणीपुरवठा संस्थेकडून करण्यात आले आहे. पाईपलाईन लिकेज झाल्यानंतर तात्काळ पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती ही गोकाक संस्थेतून देण्यात आली आहे.


Comments
Post a Comment