...अखेर कराडचे कॅप्टन शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल;मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश...


 ...अखेर कराडचे कॅप्टन शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल;मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश...

कराड दि.7-येथील माजी अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी अखेर मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून पक्ष प्रवेश प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. शिवाय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे इंद्रजीत गुजर यांच्या भेटीला दोन वेळा कराडात येऊन गेले होते. नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांनी या प्रवेश याबाबत माध्यमांशी चर्चा केली होती. त्याप्रमाणे आज गुजर यांचा पक्ष प्रवेश पार पडला. गुजर यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला कराड शहराच्या राजकारणात सक्षम नेतृत्व मिळाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर इंद्रजित गुजर यांच्यासह राकेश पवार, राजकुमार पाटील यांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी आ. दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सुपनेचे अजित जाधव, कराड शहरप्रमुख शशिराज करपे, युवासेना शहर प्रमुख अक्षय गवळी यांच्यासह ठाकरे गटाचे कराडातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कराडच्या राजकारणात इंद्रजित गुजर यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना  पक्षाला नक्कीच फायदा होणार असून त्यांच्यामुळे पक्षाची ताकद कराड सारख्या नामांकित शहरात मिळणार आहे. आगामी काळात या लोकांना ताकद देण्याचे काम शिवसेना काम नक्की करेल असा विश्वास यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक