डॉ. अतूलबाबांना आमदार झालेलं बघायचं आहे; देवेंद्र फडणवीस..

 


अतुल बाबांना आमदार झालेलं बघायचं आहे; देवेंद्र फडणवीस...

सातारा लोकसभेसह कराड दक्षिणेत कमळ फुलवणार...

कराड, दि. 22 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत. ही सर्व विकासकामे आम्ही जनतेपर्यंत घेवून जात असून जिल्ह्यातील जनतेचा कौलही भाजपच्याच पाठीशी राहील याची आपणास खात्री आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार व  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून येणार असल्याचे दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

येथील कल्याणी मैदानावर भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत भव्य लाभार्थी संमेलनात बोलत होते. खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, माजी खा. अमर साबळे, माजी आ. मदनराव भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, डॉ. सुरेश भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, धैर्यशील कदम, मनोज घोरपड, विक्रम पावसकर आदी यावेळी उपस्थिती होती.

ना. फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. सरकारची नऊ वर्ष भारताच्या विकासगाथेला पुढे नेणारी ठरली आहेत. या सरकारने सामान्य माणसांना विकासामध्ये भागीदार केले आहे. करोना कालावधीत संपूर्ण देशातील जनतेला दोन वर्ष मोफत अन्न-धान्य देण्याचा विक्रम देशात  झाला असून संपूर्ण जगणे त्यांचे कौतुक केले. सर्वसामान्यांना 25 लाख घरे दिली. आयुष्मान भारतच्या माध्यमातून 71 लाख जणांना लाभ मिळाला. तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. त्यानुसारच राज्य सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे. 41 लाख तरुणांना मुद्रा लोनच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे केले. चार लाख कोटींची कामे मोदींनी महाराष्ट्रात केली  आहेत. पाच वर्षात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्रात समृद्धी आण्याचे काम झाले आहे. 2014 ते 19 दरम्यान 48 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन व्यवस्था करण्याचे काम सरकारने केले आहे. परंतु, अडीच वर्षाच्या सरकारने सिंचनासाठी एक पैसाही दिला नसल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली. 

2019 मध्ये राज्यातील सिंचनाची जी कामे ज्या स्थितीत होती. ती कामे आजही त्याच स्थितीत असल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले आमचे सरकार निधी उपलब्ध करून देत या सिंचन प्रकल्पांना गती देणार असुन शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा देण्यात येणार आहे. शिवाय मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात दहा लाख वीस कनेक्शन देण्यात येणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी रथात बसून राज्याचा गाडा हाकला का?...

पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना मणिपूरकडे बघायला वेळ नाही आणि हे विदेश दौऱ्यावर निघालेत, अशी टीका केली होती. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, जे मातोश्रीपासून वरळीपर्यंत गेले नाहीत, त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे का? हे त्यांनी पहावे. मोदींनी करोना लस बनवली, असे मी म्हटल्यावर ठाकरेंना राग आला. लसीकरणाचे कच्चे रॉ मटेरियल मोदींमुळेच भारताला मिळाले. 800 कोटी रुपये देऊन त्यांनी लस तयार करून घेतली. परंतु, असे असेल तर उद्धव ठाकरे हे घोड्याच्या  रथामध्ये बसून महाराष्ट्राचा गाडा हाकत होते का? असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

'कृष्णा खोरे'ची निर्मिती माझ्या मागणीवरूनच...

स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करण्याची विनंती आपण त्यांच्याकडे केली होती. त्याला त्यांनी तात्काळ मान्यताही दिली. परंतु, ४०-४५ वर्षे काँग्रेसचे राज्य असताना त्यांना हे शक्य झाले नाही. की त्यांना ते करायचे नव्हते? असा सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

अतुलबाबांना आमदार झालेलं बघायचंय!...

युवा नेते अतूलबाबांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर  टाकल्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अतूलबाबांनीं लढा दिला. तसेच फडणवीस साहेबांनी टाकलेली प्रत्येक जबाबदारी अतूलबाबा सक्षमपणे निभावत असून फडणवीस साहेबांना येत्या विधानसभा निवडणुकीत अतूलबाबांना आमदार झालेलं पाहायचं, असे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

साताऱ्यात भाजपचा खासदार आणायचायं....

डॉ. अतुल भोसले यांनी पंतप्रधानाच्या माध्यमातून भाजपने राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यासह कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक कार्यक्रम देत फडणवीस साहेबांनी विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणायचे काम आपल्याला करावयाचे असल्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक