कराडच्या प्रीतीसंगमात बूडून बारावी पास यूवतीचा मृत्यू...
कराडच्या प्रीतीसंगमात बूडून बारावी पास यूवतीचा मृत्यू;काटरे-बनसोडे परिवारावर शोककळा...
कराड दि.8-(प्रतिनिधी) येथिल कृष्णा कोयना नदीच्या प्रीतीसंगमात सेजल बनसोडे (वय १८) यूवतीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांयकाळी घडली आहे. सायंकाळी घडलेल्या या घटनेने कृष्णा घाठावर एकच खळबळ उडाली असुन रात्री उशिरा यूवतीचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. सबंधित यूवती कराड यैथिल आपल्या नातेवाईकांकडे आली होती. कूटूंबियासमवेत सांयकाळी घाटावर गेले होते.सेजल नूकतीच बारावीची परिक्षा पास झाली होती.सेजल बनसोडे ही कराड नगरपरिषदेचे वरीष्ठ मुकादम मारूती काटरे यांची भाची आहे.
कराड तालुक्यातील रेठरे धरण येथील सेजल बनसोडे (वय १८) ही यूवती येथिल आपल्या नातेवाईकांकडे कराडला आली होती. नातेवाईकांसोबत ती व तीचे कुटुंबीय प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यातील काही मूली नदीपात्रात उतरून पोहण्याचा आंनद घेत होते. एकूण चार मुली या नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते.संगमातील खोल भागात या मूली गेल्यानंतर एका मुलीचा हात इतर मूलींकडून सूटल्याने सेजल ही नदीपात्रात बूडाली.तिच्या सोबत असणार्या मूली व नातेवाईकांनी तात्काळ पात्रात उड्या घेत शोध मोहिम राबवली.
संगमात साधारण दोन तासहून अधिक वेळ शोध घेतल्यानंतर या यूवतीचा मृतदेह शोधण्यात यश आले त्यानंतर मृतदेह येथिल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
Comments
Post a Comment