महाराष्ट्रात मान्सून सक्रीय;कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर...
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय;कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर...
कराड दि.25 (प्रतिनिधी) महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात ही मान्सूनने जोर धरला असून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली सुरवात केली आहे. मात्र कालच्या पेक्षा आज पावसाचा जोर कमी होता. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मशागती व पेरणीच्या कामात गुंतला आहे. मात्र तरीही आषाढी वारी व बेंदरा नंतरच शेतीच्या कामाला गती येणार आहे.
आज कोयना, नवजासह महाबळेश्वर येथे पावसाचा जोर कमी होता. आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत कोयना येथे 24 मिलिमीटर, नवजा येथे 28 तर महाबळेश्वर येथे 38 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 10.75 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान कराड शहर व परिसरात पावसाने सकाळ पासून हजेरी लावली मात्र दुपार नंतर पाऊस थांबला होता. दुपार नंतर ढगाळ वातावरण होते. मात्र तालुक्यात आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
आज सांयकाळी पाच वाजेपर्यंत...
कोयना-24 मिलिमीटर (180)
नवजा-28 मि.मी.(210)
महाबळेश्वर-38 मि.मी.(274)
Comments
Post a Comment