माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला पाणी टंचाईसदृश गावांचा आढावा...


 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला पाणी टंचाईसदृश गावांचा आढावा... 

कराड दि.9- : सद्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कराड तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे अशा गावांचा आढावा आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, तालुका गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार बी. के राठोड, पी डब्लू डी, एम जी पी आदी विभागांचे अधिकारी आदींच्यासह मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. 

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील टंचाई सदृश गावांचा गावनिहाय आढावा घेतला. त्या गावातील सद्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच उपस्थित असणाऱ्या त्या त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या जाणून घेत त्याप्रमाणे सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कराड तालुक्यात वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी-नांदगाव, भरेवाडी, ओङोशी, मस्करवाडी-उंब्रज, घोलपवाडी, गोसावीवाडी, गायकवाडवाडी, नाणेगाव, कोरीवले, वडगाव-उंब्रज, गोडवाडी, अंधारवाडी आदी गावामध्ये सद्या टँकरने पाणीपुरवठा सुरु असून यामधील  वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी-नांदगाव, भरेवाडी,या गावांना मलकापूर नगरपरिषदेतून टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे अशा गावांना तात्काळ टँकर पाठविले जावेत अशा सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या. 

मान्सून लांबणीवर गेल्यामुळे पाणी टंचाई परिस्थिती अधिक भीषण होऊ नये यासाठी हि टंचाई बैठक महत्वाची मानली जात आहे. या आढावा मिटिंग मधून ज्या गावांना अजूनही पाणी टँकर ने सुरु नाही तिथे टँकर देण्याच्या सूचना दिल्या गेल्या तसेच संबंधित गावातील बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरण अशी कामे तात्काळ केली जावी अशा सूचना यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच याबाबतचा अहवाल देखील सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक