कराड तालुक्यातील रेठरे पुल तीन दिवस राहणार वाहतुकीस बंद...
कराड तालुक्यातील रेठरे पुल तीन दिवस वाहतुकीस बंद...
कराड, दि. 26– कृष्णा नदीवरील रेठरे गावाजवळील रेठरे पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाची भारवाहन क्षमता तपासण्यात येणार आहे. त्यानुसार पुलाच्या 15 गाळ्यांपैकी 3 गाळ्यांची भारवाहन क्षमता तपासणी विरमाता जिजाबाई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या देखरेखीखाली दि. 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत सदर पुलावरून होणारी पादचारी व सर्व प्रकारची वाहतूक पुर्ण बंद राहणार असल्याचे सं. द. सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (प) विभाग, सातारा यांनी कळवले आहे.
सध्या असलेल्या या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी व त्याच ठिकाणी नव्याने दुसऱ्या पुलासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर केला असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे तर नवीन पुलाच्या उभारणीसाठीच्या कामास सुरुवात ही झाली आहे.

Comments
Post a Comment