कराड नगर परिषदेने जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करावी;जिल्हाधिकारी यांचे आदेश...
कराड नगर परिषदेने जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करावी; जिल्हाधिकारी यांचे आदेश...
कराड दि. 30 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेने पाणीपट्टी आकारणी मध्ये केलेल्या दरवाढीस यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्याधिकारी कराड नगरपरिषद यांना आज देण्यात आले आहेत.
याबाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की कराड नगर परिषदेने पाणीपट्टी बिलामध्ये केलेली वाढ कमी करण्याबाबत कराड येथील नागरिकांच्या विनंती अर्जचा विचार करून कराड नगर परिषदेने पाणीपट्टी आकारणी मध्ये केलेल्या वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ कराड नगर परिषदेने पाणीपट्टी आकारणी मध्ये केलेल्या वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून जुन्या दराने पाणीपट्टी आकारणी करण्यास स्थगिती देण्यात आली नाही.
तरी आपल्या स्तरावरून नियमानुसार जुन्या दराने पाणीपट्टी आकारण्याची कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच चालू आर्थिक वर्षातील तसेच सन 2022-23 व त्यापूर्वीची थकीत पाणीपट्टी वसुलीची कारवाई तात्काळ सुरू करून केले कार्यवाही बाबत या कार्यालयास अवगत करावे असेही आदेशात म्हटले आहे

Comments
Post a Comment