ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन...


ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील साहेब  यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन...

कराड-दि.28- येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे वतीने, शनिवार दिनांक १ जुलै रोजी ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील साहेब यांची 106 वी 'जयंती' साजरी करण्यात येणार आहे.

प्रतिष्ठानचे वतीने, सकाळी ९.३० वाजतां, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर व सर्व विश्वस्त आणि संयाेजन समिती सदस्य, साहेबांच्या मंगळवार पेठ येथील निवासस्थानी साहेबांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन, भावपूर्ण आदरांजली अर्पण करणार आहेत. तद्नंतर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्षांसमवेत उपाध्यक्ष,  सर्व विश्वस्त व संयाेजन समिती सदस्य, आदरणीय     स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.

दुपारी ४ वाजतां,पत्रकार परिषदेमध्ये कार्याध्यक्ष आ. बाळासाहेब पाटील हे सन २०२३ च्या 'आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण' पुरस्कारकरिता अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या महाराष्ट्र राज्यातील, मान्यवर विभूतिच्या नावाची घाेषणा करणार आहेत. यावेळी सर्व विश्वस्त व संयाेजन समिती सदस्यांची उपस्थिती असणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक