सेवा सहयोग फाउंडेशनकडून कराड दक्षिणेतील शाळांना लाख मोलाची मदत...
सेवा सहयोग फाउंडेशनकडून शाळांना लाख मोलाची मदत...
कराड दक्षिणेतील 13 शाळांना स्कूल कीट वाटप: 5 संगणक संच भेट...
कराड, दि.24: सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांच्या 'स्कूल किट' या उपक्रमाअंतर्गत व ओंड आणि परिसरातील युवक युवतींच्या सहकार्याने कराड दक्षिणेतील 13 शाळांना 700 'स्कूल किट' चे वाटप करण्यात आले. सदर स्कूल किट मध्ये एक उच्च प्रतीची स्कूल बॅग, नोटबुक्स, एक आर्ट बुक, कलर बॉक्स, कंपास बॉक्स आणि शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठीचे एक पाऊच असे अंदाजे प्रत्येकी 600 रुपयाचे किट देण्यात आले. सेवा सहयोग यांच्याकडून मिळालेल्या या भेट स्वरूप वस्तूंची किंमत रुपये 4 लाख एवढी आहे.
दरम्यान, येवती येथील जिल्हा परिषद शाळेस 5 संगणक संचही देण्यात आले.कराड दक्षिण तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालय येळगाव, जि.प.प्राथमिक शाळा गोटेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल येणपे, जि.प.प्राथमिक शाळा येणपे, जि.प.प्राथमिक शाळा येवती, येवती माध्यमिक विद्यालय, भैरवनाथ विद्यालय म्हासोली, जि.प.प्राथमिक शाळा शेळकेवाडी, विठ्ठलवाडी, तुळसण, ओंडोशी, पं.गो.व.प.हायस्कूल ओंड, जि.प.प्राथमिक शाळा जाधवमळा या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शाळा सुरू होतानाच हे स्कूल कीट मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
ओंड गावचे सुपुत्र आबासो थोरात यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. स्कूल कीट व शालेय साहित्य वाटप करण्यासाठी ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, आबासो थोरात यांचे सहकारी निलेश थोरात, प्रवीण थोरात, अभिजित कोठावळे, विठ्ठल पांढरपट्टे, राहुल शिंदे, योगेश वारे, संदीप थोरात, प्रताप थोरात, सौ.शोभा देसाई, सौ.पूनम शेवाळे, अश्विनी थोरात, दिपाली थोरात यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, येवती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 5 संगणक संच सेवा सहयोग फाउंडेशनकडून देण्यात आले. संगणक संच करिता येवती येथील ग्रामस्थ दिपक शेवाळे यांनी सहकार्य केले. स्कूल कीट आणि संगणक संच उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांबद्दल आबासो थोरात व त्यांच्या टीमचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.





Comments
Post a Comment