उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये गुरुवारी भव्य लाभार्थी संमेलन...

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये गुरुवारी भव्य लाभार्थी संमेलन...


बुधवारी कराड मुक्कामी येणार; भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन...

 

कराड, ता. २० : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता कराड येथे भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत देशभर मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविली जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २१) रात्री कराड येथे मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता. २२) सकाळी १० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने व्यापक चर्चा होणार आहे.

 

यानंतर सकाळी ११ वाजता कराड येथील कल्याणी ग्राऊंडवर भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभा होणार असून, या सभेला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भरत पाटील, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मदन भोसले, मनोज घोरपडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या लाभार्थी संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक