कराडात डंपरच्या धडकेत दूचाकीस्वाचा जागीच मृत्यू;महिला जखमी...
कराडात डंपरच्या धडकेत दूचाकीस्वाचा जागीच मृत्यू;महिला जखमी...
कराड दि.१४- पूणे-बेंगलोर महामार्गावर कराड नजीक सलग दूसर्या दिवशी आणखी एक जीव गेला आहे. पाटण तिकाटणे येथे डंपरने दूचाकीस धडक दिल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर दुचाकीवर असणारी एक महिला जखमी झाली आहे. घटनास्थळी वाहतूक शाखा, कराड शहर पोलीस स्टेशन अपघात विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.
जयदीप जयसिंग खूडे (वय-28) यांचा जागीच मृत्यू झाला असुन नम्रता दादासो चावरे (वय-23) ही महिला जखमी झाली आहे.खुडे हा साळशिरंबे (खूडेवाडी) येथिल रहिवासी आहे.
पाटण तिकाटण्यातून कराड बाजूकडे जाणाऱ्या रोडवर डंपरने दुचाकीला धडक दिल्याची घटना सहा वाजण्याच्या सूमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी वर दोघे जात असताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दर्शीने सांगितले. संबंधित दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला असून जखमी महिलेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी सपोनि अमित बाबर, पो.काॅ.धीरज चतूर यांच्यासह महामार्ग पोलिस कर्मचारी,कराड वाहतुक नियत्रण शाखेचे कर्मचारी, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगिर आगा उपस्थित होते.
दरम्यान याठिकाणी गॅस पाईपलाईनचे काम सूरू असल्याने रोडवर साहित्य असल्याने रस्ता अरुंद बनला आहे.तिकाटणे येथून कोयना पूलाकडे येणारा हा रोड असुन यापूर्वी ही याठिकाणी अपघात झाले आहेत
Comments
Post a Comment