कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : २१ जून पर्यंत स्वीकारणार अर्ज...
राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : २१ जून पर्यंत स्वीकारणार अर्ज...
कराड दि.१३- सातारा जिल्हा तसेच कराड व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतन, कराड ही संस्था वर्ष १९५७ मध्ये स्थापन झालेली असून संस्थेला All India Council for Technical Education, New Delhi (AICTE) व Directorate of Technical Education, Mumbai (DTE) ची मान्यता आहे. कराडचे शासकीय तंत्रनिकेतन Maharashtra State Board of Technical Education, Mumbai (MSBTE) संलग्न असून संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल व मेकॅट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेतील इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील NBA मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांकरिता पात्र विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य डाॅ.राजेंद्र पाटील यांनी प्रत्रकार परिषदेत दिली.
कराडच्या या संस्थेमध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व मेकॅनिकल या अभ्यासक्रमांच्या स्वतंत्र तुकड्या उपलब्ध असून अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव असतात. परंतु अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे शिल्लक जागांवरती इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर राखीव जागांचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी यावेळी केले.
कराडच्या तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्याकरिता सुसज्ज प्रयोगशाळा व संगणक/इंटरनेट सुविधा, सर्व शाखेत तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, जिमखाना तसेच क्रीडा स्पर्धा, विद्यार्थिनी करिता वेगळी कॉमन रूम, अद्यावत ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी सहकारी भांडार, परिसर व विद्यार्थी सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड व वाहन पार्किंगसाठी वाहनतळ उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यासाठी २४० व विद्यार्थीनीसाठी १६० क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना Campus Interview द्वारे नामवंत कंपन्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध होते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मुलाखातीअंती २१५ विद्यार्थांना Tata Motors Ltd, L&T Thermax, Bajaj Auto Ltd, Flex India Ltd, KSB Pumps Ltd, GE India Ltd. JSW Steel Ltd., Cummins Ltd, Precision Seals Ltd. सारख्या नामांकित कंपन्यामध्ये नोकरीमिळाली आहे. तसेच पदविका (डिप्लोमा) पूर्ण झाल्यावर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रीकी पदवीस प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.
कराड परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधा केंद्राचा लाभ विद्यार्थी व पालक यांनी करून घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र का. पाटील, प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा. रजनीश पिसे (९४२२४०१८७३), सल्लागार प्रा. आनंद पेंढारकर (९४२३०५१६३०) व उपाध्यक्ष श्रीमती प्रा.ज.ल.गावडे (९८९०८३०७०२) व डॉ. प्रा. सुरेंद्र वि. खवळे (९७६३५०२१३७) यांनी केले. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा.स्वाती साळवे व आभार प्रदर्शन श्रीमती प्रा. गजराली पटेल यांनी केले.तसेच मा. प्राचार्य राजेंद्र का.पाटील यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व दाखले विहीत वेळेत उपलब्ध करून देणेबाबत महसूल खात्यास नम्र आवाहन केले.
Comments
Post a Comment