कराडच्या भरवस्तीत पिस्तूलसह एक जण जेरबंद..

 


कराडच्या भरवस्तीत पिस्तूलसह एक जण जेरबंद..

कराड दि.१० (प्रतिनिधी) बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी कराडच्या कृष्णा पॅलेस हॉटेल येथे एक जण आला असता डीवायएसपी अमोल ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचून त्यास पिस्तूल सह ताब्यात घेतल्याची घटना आज घडली आहे.याप्रकरणी वाघेश्वर मसूर येथील शंकर बधू यास पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सातारा जिल्हा पो.प्रमुखांनी जिल्हयात अवैध शस्त्र, बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहिम तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने आज येथिल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन शंकर बदु रा. वाघेश्वर मसुर (ता.कराड) हा बेकायदा बिगर परवाना पिस्टल विक्रीकरीता कराडच्या हॉटेल कृष्णा पॅलेस येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनूसार त्यांनी कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून, त्यांना सदर माहिती देऊन सापळा रचुन कारवाई करणेबाबत सूचना केल्या. पोलीस पथकाने लागलीच दोन पंच तसेच कार्यालयातील इतर स्टाफसह हॉटेल कृष्णा पॅलेस या ठिकाणी दोन टिम तयार करून सापळा रचला. संशयित इसमाची चाहुल लागताच त्यास पथकातील अंमलदार यांनी जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे पाठीमागील बाजुस एक पिस्टल व त्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत राऊंड मिळुन आले.सदर पिस्टलची किंमत अंदाजे ५०,०००/- व जिवंत राऊडी किंमत अंदाजे ३००/- रु. असुन ते जागीच जप्त केले. तसेच शंकर बदु जाधव यास ताब्यात घेतले असून, त्याचेविरुध्द कराड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच म.पो. का. कलम ३७(१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मागदर्शनाखाली वाचक पो.उ.नि.  राजेंद्र पुजारी, सहा.फौ. अरुण दुबळे, पोलीस अंमलदार सागर बर्ग, असिफ जमादार, प्रविण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव यांचे पथकाने केली आहे. सदर कारवाईबद्दल वरीष्ठ अधिकार्‍यांमी कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक