डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी बसस्थानक परिसरात फेरी मारत वाहतुक व्यवस्थेची केली पाहणी...
सध्या शहरात विशेष करून बाजारपेठेत बस स्थानक परिसर, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, आझाद चौक, शाहू चौक, दत्त चौक, चावडी चौक, कृष्णा घाट आधी ठिकाणी वाहतुकीचा तसेच या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा गेटमुळे होणारी अडचण शहरात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. नागरिक या चौकात जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. याबाबत नागरिकांच्या कडून, विविध सामाजिक संघटनांच्या कडून पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल होत असतात तसेच याबाबत सोशल मीडियावर चर्चाही घडत असतात. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी आज फेरी मारत पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी आज वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील, पोउनि. दीपक जाधव यांच्या समवेत कर्मवीर भाऊराव पुतळा येथील सिग्नल यंत्रणा तसेच या परिसरात असणारे रिक्षा गेट व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे हातगाडे, पार्किंग यांची पाहणी करत अलंकार हॉटेल, तृप्ती हॉटेल, राज मेडिकल, बस स्थानक समोरील फुटपाथ या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली व वाहतूक नियंत्रण शाखेस याबाबत विविध सूचना करत कारवाई करण्याचे आदेश दिले.
दरम्यान या परिसराची पाहणी करत असताना डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी ऑन द स्पॉट काही वाहनांच्यावर कारवाईच्या आदेशही दिले. चुकीच्या ठिकाणी पार्क करणाऱ्या गाड्या, रिक्षा, हाताकडे यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले तसेच या ठिकाणी येत असलेल्या विविध अडचणी, समस्या बाबत माहिती घेतली. शहरातील अधिकृत रिक्षा थांबे बाबत नगरपालिकेकडून माहिती घेऊन त्या त्या रिक्षा गेटची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे नियोजन करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या.
Comments
Post a Comment