महामार्गावर बसचा भीषण अपघात... बस पेटल्याने 25 जणांचा जागीच मृत्यू...
महामार्गावर बसचा भीषण अपघात... बस पेटल्याने 25 जणांचा जागीच मृत्यू...
बुलढाना दि.1- बुलढाणा जिल्ह्यात खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये 33 प्रवासी होते. यातील 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावा जवळ समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
बस समृध्दी महामार्गावर दुभाजकाला धडकली व बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक आणि वाहक सुखरुप बाहेर पडले. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कोणालाच बाहेर पडता आले नाही.

Comments
Post a Comment