कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु..

 


कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु...

कराड दि.30-शैक्षणिक वर्ष 2023-24 चे इयत्ता बारावी व सीईटी चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. सदरची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते व त्यासाठी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयासाठी एकत्र अर्ज दाखल करू शकतात. सदर अर्ज राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्या cet.cell.mahacet.org/CAP-landing-page-2023 या संकेतस्थळावरून भरला जाऊ शकतो. अशी महिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉ. एस. जे. वाघ व प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. आळसुंदकर यानी पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेला नियामक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग, सहा. प्राध्या. तथा प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. यु एस पाटील, सहा. प्राध्या. विद्युत अभि. डॉ. एस के पाटील, सहा. प्राध्या. तथा डीन अकॅडमीक डॉ. एल एल कुमारवाड. टी पी ओ सहाय्यक (क) प्रा. पौर्णिमा कावलकर, प्रा. उमा पाटील उपस्थित होते. 

दरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. 6 जुलै रोजी सन 2023-24 च्या प्रवेश प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विभागात दिला जाणारा प्रवेश व त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी पालकांनी उपस्थित रहावे असे आव्हान ही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे ARC केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड ही संस्था १९६० मध्ये स्थापन झालेली असून संस्थेस AICTE तसेच DTE मान्यता प्राप्त आहे. संस्थेला सन २०१५ पासून विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारा शैक्षणिक स्वायतता (Academic Autonomy ) प्रदान करण्यात आलेली आहे. संस्थेत एकूण ५ पदवी, व ८ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे अध्यापन केले जाते. सिविल इंजीनीरिंग, मेकॅनिकल इंजीनीरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील NBA मानांकन प्राप्त आहे.

संस्थेला वर्ल्ड बँके द्वारा प्रायोजित तंत्रशिक्षण दर्जा सुधार योजना (TEQIP) अंतर्गत अर्थ सहाय्य प्राप्त असून संस्थेने TEQIP-II योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात पहिला व देश पातळीवर दूसरा क्रमांक पटकाविला आहे. संस्थेत सामाजिक विषयावरील तंत्रद्यान निगडीत समस्यांवर उपाय योजण्याकरीता केंद्र शासन पुरस्कृत उन्नत भारत अभियान अंतर्गत विविध प्रयोग केले जातात. तसेच संस्थेत विद्यार्थ्याच्या व्यावसायिक कला गुणांना वाव मिळावा व नूतन व्यावसायिक घडावे, या करीता समर्पित Start Up Cell कार्यरत आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी अंतिम वर्षात विविध कॅम्पस इंटरव्ह्यु मध्ये भाग घेत असतात. त्याद्वारे त्यांची अनेक नामवंत कंपन्यांमध्ये निवड होत असते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना ४५० हून अधिक ऑफर्स मिळाल्या असून कमाल पॅकेज १८ लाख व किमान पॅकेज ३ लाख इतके होते. सरासरी पॅकेज ५ लाख इतके होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत एम पी एस सी परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक पटकावले आहेत.

संस्थेतील उपलब्ध या सुविधा केंद्रचा लाभ विद्यार्थी व पालक यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. स. ज. वाघ, प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. आळसुंदकर (९६८९२३३३१९) यांनी केले. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास नमूद केलेल्या भ्रमणध्वनि क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवहन करण्यात आले आहे 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक