कराड जवळ टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गूटखा पकडला...
कराड जवळ टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गूटखा पकडला...
कराड दि.9 (प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावचे हद्दीत तळबीड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 25 लाख 12 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर कराड तालुक्याचे हद्दीत रात्री 11 ते 4 रात्र गस्त सुरू असताना गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना गुटख्याची वाहतुकी संदर्भात माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर आर वरोटे तसेच पो.काॅ.निलेश विभुते, पो.काॅ. प्रवीण गायकवाड यांनी तासवडे टोल नाका येथे थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम एच 14 के क्यू 4187 हा टोल भरून जात असताना त्यास थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित टेम्पो न थांबता तसाच महामार्ग वरून पुणे बाजूकडे भारधाव वेगात गेला. पोलिसांनी सदर टेम्पोचा पाठलाग करून त्यास वराडे गावचे हद्दीत थांबवून वाहनाची तपासणी व चौकशी केली असता टेम्पोमध्ये विमल गुटखा व वी-1 कंपनीची तंबाखू अशी एकूण 42 पोती मिळून आली.
सदर टेम्पो मधून विलास बलू जाधव (वय 45) रा. निगडी पुणे मूळ रा.सनमडी जि.सांगली, सचिन संजय रेड्डी (वय 20) रा. कुमठा जि. लातूर मूळ रा.चिखली जि.पूणे हे सदर गूटखा कर्नाटक येथून पुणे येथे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जाधव व रेड्डी यांच्याविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदरची कामगिरी तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर आर वरोटे, पोलीस फौ. पिसाळ, पोलीस फौ. खराडे, पोलीस हवा. ओंबासे पो. कॉ. विभुते, सहाय्यक मपशी साळुंखे व मोहिते, पो. कॉ. गायकवाड यांनी केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्वा अधिकार व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment