कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी; कोयना धरणात 10.75 टीएमसी पाणीसाठा...
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी; कोयना धरणात 10.75 टीएमसी पाणीसाठा...
कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात मान्सूनने अद्यापही जोर धरला नसला तरी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. काल आज पावसाने हजेरी लावली असून कोयना, नवजा सह महाबळेश्वर येथे सध्या पाऊस सुरू आहे. आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत कोयना येथे 49 मिलिमीटर, नवजा येथे 44 तर महाबळेश्वर येथे 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 10.75 टीएमसी पाणीसाठा माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान कराड परिसरात पावसाच्या दिवसभरात अधून मधून हलक्या सुरू होत्या. दुपारनंतर हवेत गारवा निर्माण झाला. मात्र अद्यापही तालुक्यात काही भागात पावसाचे आगमन झालेले नाही. सध्या कृष्णा कोयना नदीचे पात्र खालावत चालले आहे.
आज सांयकाळी पाच वाजेपर्यंत...
कोयना-46 मिलिमीटर (140)
नवजा-44 मि.मी.(160)
महाबळेश्वर-87 मि.मी.(208)
Koyna Dam
Comments
Post a Comment