कराडात RRR सेंटर्सचे उदघाटन; मोठ्या प्रमाणात वापरा योग्य साहित्य जमा...
कराडात RRR सेंटर्सचे उदघाटन; मोठ्या प्रमाणात वापरा योग्य साहित्य जमा...
कराड दि.19- (प्रतिनिधी) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) आदेश नुसार कराड नगर परिषदे मार्फत "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान सूरू करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत आज नगरपरिषदे नजीक "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR केंद्राचे बॅंक आफ इंडियाचे माजी शाखा अधिकारी व पर्यावरण प्रेमी प्रफुल्ल ठाकूर, पर्यावरण मित्र चंद्रकांत जाधव, आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्या ऊपस्थित आज उदघाटन करण्यात आले. यावेळी वरीष्ठ मुकादम मारूती काटरे, मूकादम अभिजित खवळे, प्रमोंद कांबळे, अशोक डाईंगडे, संजय चावरे, भास्कर काटरे, विनोद कसबे उपस्थित होते.
कराड नगरपरिषदेच्या आण्णाभाऊ साठे समाज मंदीरात हे मुख्य केंद्र सूरू झाले असून पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात 14 ठिकाणी अशी केंद्रे सूरू करण्याचे नियोजन असून निरूपयोगी वस्तू कमी करणे, त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, प्रक्रिया करणे हा उद्देशाने हे अभियान सूरू करण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य अभियंता आर डी भालदार यांनी दिली. नागरिकांनी आपल्या घरातील वापरण्या योग्य जून्या वस्तू आरआरआर सेंटरमध्ये आणून द्याव्यात व या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन ही भालदार यांनी केले आहे.
जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, भांडी, चप्पल, बूट आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" म्हणजेच RRR सेंटर्स उभे केले आहे. या सेंटर्स मध्ये संकलित कलेल्या वस्तू नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यासाठी उपयोगी ठरतील. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन अशा केंद्रात साहित्य जमा करावे असे आवाहन ही नगरपरिषदेने केले आहे.


Comments
Post a Comment