कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास आंदोलन;बळीराजा शेतकरी संघटना, कराडात आसूड ओडत प्रशासनाला निवेदन...
कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास आंदोलन;बळीराजा शेतकरी संघटना, कराडात आसूड ओडत प्रशासनाला निवेदन...
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) दिल्लीत सूरू असलेल्या कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी बळीराजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासकीय कार्यालय परिसरात काढण्यात अलेल्या आसूडाच्या फटक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देत तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली...पूढे वाचा...
या निवेदनात म्हटले आहे की, गेले सहा महिने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे कामकाज बंद आहे. गुंठेवारी पद्धतही बंद असल्याने खरेदी-विक्री व्यवहार बंद असून शेतकऱ्यांची अनेक प्रकारे अडचण होत आहे. तेलंगणा, कर्नाटक राज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा दहा तास मोफत वीज मिळावी. आदी. प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत. तसेच दिल्ली येथील ऑलिपिक कुस्ती पट्टृंना तात्काळ न्याय द्यावा. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


Comments
Post a Comment